33 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
घरराजकारणपूर्वी शिवसैनिक असल्याने वाझे यांना वाचवण्याचा प्रयत्न झाला का? - देवेंद्र फडणविस

पूर्वी शिवसैनिक असल्याने वाझे यांना वाचवण्याचा प्रयत्न झाला का? – देवेंद्र फडणविस

Google News Follow

Related

ॲंटिलियाच्या समोर आढळलेल्या जिलेटिनच्या काड्या असलेल्या स्कॉर्पियो गाडीच्या प्रकरणाच्या संदर्भात पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत सातत्याने विरोधी पक्षाकडून सरकारवर दबाव निर्माण करण्यात आला होता. या संदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणविस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हे प्रकरण गंभीर असल्याचे सांगितले.

अतिशय गंभीर प्रकरण

माध्यमांशी सविस्तर बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणविस यांनी सांगितले की, हे प्रकरण गंभीर आहे. पोलिस दलातीलच काही अधिकारी जर अशा प्रकारे वागू लागले तर, राज्यात कायदा- सुव्यवस्था राहिल कशी?

राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री जणू काही वकिल असल्यागत त्यांचा वाझेंना पाठिशी घालण्याचा प्रयत्न चाललेला होता. ते ओसामा बिन लादेन आहेत का वगैरे प्रश्न देखील यावेळी करण्यात आले होते. या प्रकरणात एनआयएला अनेक पुरावे सापडले आहेत. स्फोटकांच्या बाबत एनआयएकडून तपास केला जात आहेच परंतु यातील मनसुख हिरेन यांच्या हत्येची चौकशी हा देखील यातील महत्त्वाचा भाग आहे. त्याचे देखील धागेदोरे- पुरावे उपलब्ध होत आहे. असे देखील देवेंद्र फडणविस यांनी सांगितले.

हे ही वाचा:

अंबानींच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली

निलंबन उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार

यापूर्वी सचिन वाझे यांना उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निलंबित करण्यात आले होते. मात्र देवेंद्र फडणविस यांच्या सरकराच्या काळात देखील शिवसेनेकडून सातत्याने त्यांना पुन्हा सेवेत रुजू करून घेण्याचा लकडा लावण्यात आला होता. यासंदर्भात बोलताना देवेंद्र फडणविस यांनी सांगितले की, त्यावेळी मी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री होतो. त्यामुळे या संदर्भात ॲडव्होकेट जनरल यांच्याशी चर्चा करून त्यांचा सल्ला घेतला. त्यावेळेस, वाझे यांचे निलंबन उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार झाले असल्याने त्यांना पुन्हा सेवेत घेणे हा न्यायालयाचा अवमान ठरेल असे ॲडव्होकेट जनरल यांनी सांगितले होते.

या सरकराच्या स्थापनेनंतर कोरोनाचे कारण पुढे करत, निलंबित अधिकाऱ्यांची गरज असल्याचे सांगत त्यांना पुन्हा एकदा सेवेत रुजू करून घेतले होते. सेवेत घेतल्यानंतर तात्काळ क्राईम इंटेलिजन्स युनिट येथे वाझेंची नियुक्ती केली गेली. त्यासाठी पीआय दर्जाच्या अधिकाऱ्याची रातोरात बदलीदेखील करण्यात आली आणि एपीआय दर्जाचे वाझे सीआययुचे प्रमुख म्हणून नेमले गेले. त्यानंतर मुंबईतील अनेक मुख्य खटल्यांचा तपास त्यांच्याकडे देण्यात येत गेला. सरकारचा वाढता विश्वास पाहून आपण काय हवे ते करू शकतो असा विश्वास त्यांच्या मनात निर्माण झाला का? की शिवसैनिक असल्याने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न झाला हे, मला माहित नाही, असे देवेंद्र फडणविस म्हणाले.

हे ही वाचा:

सचिन वाझे कोर्टात हजर

सचिन वाझे सोबत काही सौदा ठरला होता का? – आमदार अतुल भातखळकर

वाझे प्रकरणातील ते शिवसेना नेते कोण?

आयओच झाले प्रमुख आरोपी

यावेळी त्यांनी हे देखील सांगितले की ज्या खटल्याचे आयओ हे आज त्याच खटल्यातील प्रमुख आरोपी आहेत. हे गंभीर आहे. यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टिका देखील केली. विरोधी पक्षनेता म्हणून ही माहिती घेऊन विधानसभेत मांडायची गरज पडता कामा नये. मला प्रश्न करण्याऐवजी “हे असं का घडतंय” हा प्रश्न राऊतांनी विचारावा असे फडणविस म्हणाले. हा खूप मोठा प्लॉट असून, हळूहळू तो उलगडत आहे असे देखील फडणविस म्हणाले.

हे ही वाचा:

सचिन वाझेला अटक

राज्य खिळखळे करण्याचा आरोप दुधखुळा

त्याबरोबरच त्यांनी राज्य खिळखिळे करण्याचा आरोप देखील फेटाळून लावला. आरोपींना अटक व्हावी यासाठी प्रयत्न करणारे राज्य खिळखिळं करत आहेत, की हे सगळं करणारे राज्य खिळखिळं करत आहेत असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

राष्ट्रपती राजवटीची केवळ आठवण

राष्ट्रपती राजवटीची मागणी देखील फेटाळून लावत, त्यांनी सुधीर मुनगंटीवार यांनी केवळ दाखला दिल्याचे सांगितले. नियमबाह्य वागल्यानंतर इंदिरा गांधीनी राष्ट्रपती राजवट लावली होती, याची आठवण करून देत, नियमबाह्य वागू नका असा सांगितल्याचे देवेंद्र फडणविस यांनी सांगितले.

हे ही वाचा:

“या सरकारवर राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ आली आहे”- सुधीर मुनगंटीवार

तपास यंत्रणांना त्यांचे काम करू द्यावे

तपास यंत्रणांना त्यांचे काम करू द्यावे. यात कोणावरही अविश्वासाचा प्रश्नच नाही असे देवेंद्र फडणविस म्हणाले. त्याचप्रमाणे डेलकर यांच्याप्रकरणात कारवाई करण्यापासून सरकारला कोणी रोखले नव्हते, मात्र या प्रकरणानंतर डेलकर प्रकरण काढायचे हे चूक असल्याचे मत देखील त्यांनी व्यक्त केले.

वाझे यांना नुकतीच एनआयएची १० दिवसांची एनआयए कोठडी देण्यात आली आहे.

हे ही वाचा:

सचिन वाझे यांना पंचवीस मार्च पर्यंत एनआयए कोठडी

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
154,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा