बिहार काँग्रेसने सोशल मीडियावर एक AI-निर्मित व्हिडिओ पोस्ट केला असून, त्यात दोन पात्रं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या दिवंगत मातेसारखी दिसत असल्याचा दावा केला जात आहे. या व्हिडिओवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजप नेते दिलीप घोष यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल करत, राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.
दिलीप घोष म्हणाले, “आईचं स्वप्नात दर्शन होणं हे शुभ मानलं जातं… पण राहुल गांधींना त्यांच्या स्वप्नात काय दिसतं? ईडी, सीबीआय आणि त्यांचे परदेशी मित्र व त्यांची मालमत्ता”. त्यांनी पुढे पंतप्रधान मोदींच्या कामक्षमतेचे कौतुक करत म्हटलं, “मोदी दररोज १८ तास काम करतात. ज्यांच्यात काहीतरी करण्याची क्षमता असते, त्यांनाच स्वप्नं पडतात.”
या व्हिडिओवरून भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी काँग्रेस आणि राजदवर टीका केली आहे. पुण्यात पत्रकारांशी बोलताना अनुराग ठाकूर यांनी काँग्रेस आणि राजदवर राजकारणात “खालच्या पातळीवर” गेल्याचा आरोप केला.
ते म्हणाले, “प्रत्येकाच्या आयुष्यात आईचे स्थान सर्वात वरचे असते, परंतु काँग्रेस आणि राजद इतके खालच्या पातळीवर गेले आहेत की ते पंतप्रधानांच्या दिवंगत आईला शिवीगाळ करतात आणि एक वाईट व्हिडिओ पोस्ट करतात, यावरून काँग्रेसची मानसिकता दिसून येते. सवाल उपस्थित करत ते म्हणाले, राजकारणात इतक्या खालच्या पातळीवर जाऊन एखाद्याच्या आईला शिवीगाळ करणे आवश्यक आहे का?”.
बिहारमधील राहुल गांधींच्या रॅलीदरम्यान पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या आईवर झालेल्या कथित “अपशब्दां” नंतर त्यांनी माफी न मागितल्याबद्दल आणि चूक पुन्हा केल्याबद्दल काँग्रेसवर टीका केली. “काँग्रेसने माफी मागितली नाही, उलट चूक पुन्हा केली. बिहारची जनता त्यांना कधीही माफ करणार नाही आणि येणाऱ्या निवडणुकीत त्यांना कठोर शिक्षा देईल,” असे अनुराग ठाकूर म्हणाले.
हे ही वाचा :
पॅलेस्टाईनला राज्याचा दर्जा देण्यासाठी भारतासह १४१ देशांचा पाठींबा
इंदूर: शेजाऱ्याची खिल्ली उडवण्यासाठी कुत्र्याचे नाव ठेवले ‘शर्माजी’
पंतप्रधान मोदी करणार कुतुबमिनारपेक्षा उंच रेल्वे पुलाचे लोकार्पण!
सुशीला कार्की बनल्या नेपाळच्या हंगामी पंतप्रधान, नरेंद्र मोदींनी दिली प्रतिक्रिया
पंतप्रधान मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त भाजप नेत्या मेधा कुलकर्णी यांनी आज (१३ सप्टेंबर) आयोजित केलेल्या “पुणे ऑन पेडल” सायकल रॅली आणि “पुणे वॉकेथॉन २०२५” दरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना ठाकूर यांचे हे विधान आले आहे.
#WATCH | North 24 Parganas, West Bengal: On an AI-generated video showing two characters purportedly resembling PM Modi and his late mother, posted by Bihar Congress, BJP leader Dilip Ghosh says, "Dreaming about your mother is considered auspicious…What does Rahul Gandhi see in… pic.twitter.com/B1qh2YA7SJ
— ANI (@ANI) September 13, 2025







