26 C
Mumbai
Saturday, December 6, 2025
घरविशेषमनुस्मृती, रामचरितमानसच्या श्लोकांची आठवण करून देत न्यायालयाने ठोठावली शिक्षा

मनुस्मृती, रामचरितमानसच्या श्लोकांची आठवण करून देत न्यायालयाने ठोठावली शिक्षा

अल्पवयीन विद्यार्थिनीवर मुस्लिम शिक्षकाने केला होता बलात्कार, जन्मठेपेची शिक्षा

Google News Follow

Related

६नोव्हेंबर रोजी कुशीनगर जिल्हा न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणात त्या विद्यार्थिनीचा शिक्षक असलेल्या मोइनुद्दीन अन्सारी याला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा आणि ५ लाख रुपयांचा दंड ठोठावला. न्यायमूर्ती दिनेश कुमार यांच्या एकल खंडपीठाने हा निकाल दिला. हा निकाल देताना न्यायालयाने हिंदू धर्मातील मनुस्मृती आणि रामचरितमानसमधील श्लोकांचा उल्लेख करत शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात कसे संबंध असायला हवे होते, याचा दाखला दिला आहे.

अन्सारी हा ज्या शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून कार्यरत होता, तेथे एका कॉलेज विद्यार्थिनीवर गंभीर अत्याचार करताना कॅमेऱ्यात कैद झाला होता. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आणि भारतीय न्याय संहितेच्या कलम 64(2), 351(3) आणि पोक्सो कायद्याच्या कलम 5(c), 6 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पीडितेने न्यायालयात सांगितले की अन्सारीने तिला शाळेतील आपल्या कार्यालयात बोलावून नशा मिसळलेला पदार्थ खायला दिला आणि ती अर्धवट बेशुद्ध अवस्थेत असताना तिच्यावर अत्याचार केला. हा व्हिडिओ गावातील व्हॉट्सऍप ग्रुपवर शेअर करण्यात आला होता, जिथून शाळेच्या प्राचार्यांनी तो पाहिला.

या खटल्यात पीडित, तिचे वडील, पोलिस अधिकारी, पीडितेची वैद्यकीय तपासणी करणाऱ्या डॉ. विनिशा, कॉलेजचे प्राचार्य संतोष कुमार वर्मा यांसह एकूण १० साक्षीदारांची साक्ष नोंदवली गेली.

प्रकरणाची पार्श्वभूमी

८ एप्रिल रोजी बातमी आली होती की कुशीनगर पोलिसांनी कॉलेज शिक्षक मोइनुद्दीन अन्सारीला अल्पवयीन हिंदू मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक केली. हा प्रकार संस्थेच्या परिसरात कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला होता. व्हिडिओ कृषक इंटरमिजिएट कॉलेज, मलुडिह, थाना कसाया हद्दीतला असल्याचे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले.

घटनेचा तपशील

७ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११ वाजता ही घटना घडली. १७ वर्षीय विद्यार्थिनी कॉलेजमध्ये आली असता अन्सारीने तिला पाणी आणायला सांगितले आणि टेबलावर ठेवलेला समोसा खायला सांगितला. समोसा खाल्ल्यानंतर ती अर्ध-बेशुद्ध झाली. त्यानंतर अन्सारीने तिच्यावर अत्याचार केला, व्हिडिओ बनवला आणि काही सांगितले तर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली.

पीडितेचे निवेदन

पीडितेने सांगितले, “मी शाळेत गेले होते. समोसा खाल्ल्यानंतर मला गरगरायला लागलं. अन्सारीने माझे कपडे काढून माझ्यावर बलात्कार केला आणि व्हिडिओ बनवला.”
ती पुढे म्हणाली की तिने घरी जाऊन वडिलांना सांगितले आणि त्यांनी पोलिसात तक्रार दिली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले की तपासणी घटना घडून ४९ तासांनी झाली. नमुने प्रयोगशाळेत पाठवले गेले. प्राचार्य संतोष वर्मा यांनी व्हिडिओ पाहिला आणि घटनास्थळ व आरोपी ओळखला.

हे ही वाचा:

कुलगाम, डोडामध्ये दहशतवादी नेटवर्कवर प्रहार

अनंतनागमधील माजी सरकारी डॉक्टरकडे सापडली एके- ४७

भारत आणि आर्मेनियाने आरोग्य करारावर केली स्वाक्षरी

अबब… नोएडात महिलेचा शिरच्छेद

बचाव पक्षाचे दावे

बचाव पक्षाने हा खोटा आरोप असल्याचे सांगितले, व्हिडिओ बनावट असल्याचा दावा केला, FIR मध्ये बदल असल्याचे सांगितले आणि वैद्यकीय अहवालात नशेचा उल्लेख नसल्याचे नमूद केले.

न्यायालयाचे निरीक्षण

न्यायालयाने म्हटले की FIR “विश्वकोश” नसते, छोट्या चुका दोष सिद्धीवर परिणाम करत नाहीत. पीडितेचे साक्ष विश्वसनीय असल्यास कुटुंबातील सदस्य साक्षीदार नसले तरी हरकत नाही. तपासणी ४९ तासांनी झाल्यामुळे पीडितेने स्नान केले असण्याची शक्यता असल्याने जैविक पुरावा न सापडणे स्वाभाविक असल्याचे न्यायालयाने नमूद केले.

न्यायालयाने मनुस्मृतीमधील “यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता” आणि रामचरितमानसातील स्त्री सन्मानासंदर्भातील  “अनुज बधू भगिनी सुत नारी। सुनु सठ कुमति सम ए चारी।।इन्हहि कु दृष्टि बिलोकइ जोई। ताहि बधे कच्छु पाप न होई।” या श्लोकांचा उल्लेख करून स्त्री सन्मानाचे महत्व सांगितले आणि गुरु–शिष्य नात्याची पवित्रता अधोरेखित केली.

शिक्षा

पोक्सो कायद्याच्या कलम ६ अंतर्गत अन्सारीला आयुष्यभराची (प्राकृतिक आयुष्यभर) कैद आणि 5 लाख दंड ठोठावण्यात आला. दंड न भरल्यास अतिरिक्त दोन वर्षे कारावास. BNSS कलम 351(3) अंतर्गत 4 वर्षे सक्तमजुरी आणि २५ हजार दंड. दंडाच्या ७० % रक्कम पीडितेस देण्याचे आदेश.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा