31 C
Mumbai
Sunday, October 4, 2026
घरविशेषकोवॅक्सिन लस डेल्टा व्हेरिएंटविरोधात ६५.२ टक्के प्रभावी

कोवॅक्सिन लस डेल्टा व्हेरिएंटविरोधात ६५.२ टक्के प्रभावी

Google News Follow

Related

भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीच्या तिसऱ्या चाचणीचे परिणाम समोर आले आहेत. त्यानुसार ही लस कोरोना विरोधात ७७.४ टक्के प्रभावी असल्याचं स्पष्ट झालं आहे. तसेच डेल्टा व्हेरिएंटविरोधात ही लस ६५.२ टक्के प्रभावी असल्याचं स्पष्ट झालं आहे.

कोरोनाच्या गंभीर स्वरुपातील संक्रमणाविरोधात ही लस ९३.४ टक्के प्रभावी असल्याच स्पष्ट झालं आहे. असिम्टोमॅटिक प्रकारात ही लस ६३ टक्के प्रभावी आहे. कंपनीने आपल्या तिसऱ्या फेजच्या चाचणीमध्ये १८ ते ९८ वर्षे वयोगटातील २५,८०० स्वयंसेवकांना सामिल करुन घेतलं होतं. देशभरातील २५ ठिकाणी याची चाचणी घेण्यात आली आहे.

डेल्टा व्हेरिएंट हा भारतातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला जबाबदार आहे. त्यामुळे भारतात कोरोनाची रुग्णसंख्या आणि मृतांच्या आकड्यात मोठी वाढ झाली आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी भारतात लसीकरणाची मोहीम सुरु करण्यात आली असून सध्या कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन लस देण्यास सुरु आहे.

हे ही वाचा:

दिनो मोरिया मुंबई महापालिकेतील सचिन वाझे

५४ कारखान्यांची चौकशी व्हावी

अनिल देशमुखांना ईडीकडून तिसरं समन्स

भारतीय सैन्याला मिळाली नवी ब्रिजिंग सिस्टिम

हैदराबादच्या भारत बायोटेकची लस कोवॅक्सिन ही भारतात सापडणाऱ्या डेल्टा व्हेरिएंट आणि बीटा व्हेरिएंटवर अधिक प्रभावी असल्याचं पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि भारत बायोटेकने एका संयुक्तपणे केलेल्या अभ्यासातून या आधीच स्पष्ट झालं होतं.

अमेरिकेच्या नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ हेल्थने केलेल्या एका संशोधनातूनही कोवॅक्सिन लस ही कोरोना व्हायरसच्या अल्फा आणि डेल्टा दोन्ही रुपांवर प्रभावी ठरत असल्याचं निष्पन्न झालं आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
336,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा