काँग्रेस नेते व लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या ‘गुजरात मॉडेल’वरील वक्तव्यावर केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी तीव्र शब्दांत टीका केली आहे. त्यांनी राहुल गांधींवर देशविरोधी शक्तींशी हातमिळवणीचा आरोप करत बिहारच्या जनतेला सावध राहण्याचे आवाहन केले.
एएनआयशी संवाद साधताना ते म्हणाले, “गुजरात मॉडेल हे प्रगती, विकास आणि समृद्धीचं प्रतीक आहे. राहुल गांधी आणि त्यांच्या साथीदारांनी त्याला ‘मतचोरीचं मॉडेल’ म्हटल्याने त्यांची पराभवाबद्दलची निराशा स्पष्ट होते.” ते (राहुल गांधी) तेजस्वी यादव यांच्यासोबत बिहारच्या दौऱ्यावर आहेत आणि गोंधळ पसरवण्यात गुंतले आहेत, परंतु बिहारचे लोक याला बळी पडणार नाहीत.
ते पुढे म्हणाले, हा १९९० ते २००५ चा बिहार नाही, लालू-राबडींच्या जंगलराजाचा बिहार नाही. बिहार आधीच विकासाकडे वाटचाल करत आहे. येथे चांगले रस्ते, वीज, पाणी आणि रुग्णालयात चांगले उपचार आवश्यक आहेत, जे बिहारला मिळत आहे. देशविरोधी शक्तींशी हातमिळवणी करणे, त्यांचे विचार स्वतःच्या विचारांशी विलीन करणे आणि येथे त्यांची सेवा करणे हे राहुल गांधींच्या स्वभावात आहे…”
हे ही वाचा :
भूस्खलनामुळे चंदीगड-मनाली हायवे पुन्हा बंद
वैष्णोदेवी भूस्खलनात मंदसौरच्या दोन जणांचा मृत्यू
१० कोटींहून अधिक जीएसटी चोरीचा भंडाफोड
दरम्यान, राहुल गांधी सध्या ‘वोटर अधिकार यात्रा’ अंतर्गत बिहार दौऱ्यावर आहेत, जिथे त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली आणि ‘गुजरात मॉडेल’ला मतचोरीचं मॉडेल असल्याचं म्हटलं. यावर भाजपकडून पद्धतशीर प्रत्युत्तर दिलं जात आहे.
#WATCH | Patna: On Lok Sabha LoP and Congress MP Rahul Gandhi's statement, Union Minister Nityanand Rai says, "The Gujarat model is a model of progress, development, and prosperity, which these people have called a model of vote theft, thereby displaying their frustration over… pic.twitter.com/UNfkk3XHdZ
— ANI (@ANI) August 28, 2025







