31 C
Mumbai
Sunday, March 22, 2026
घरविशेषकच्च्या तेलाच्या किमतींमध्ये उसळी

कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये उसळी

Google News Follow

Related

मध्य पूर्वेतील इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे सोमवारी पुन्हा एकदा कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी उसळी पाहायला मिळाली. आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड आज ०.९३ टक्क्यांनी वाढून ७४.९२ डॉलर प्रति बॅरलवर गेला, तर डब्ल्यूटीआय क्रूड १.१६ टक्क्यांनी वाढून ७३.८३ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचला आहे. १३ जून रोजी इस्रायलने इराणवर हवाई हल्ला केल्यानंतरपासून कच्च्या तेलाच्या किमती झपाट्याने वाढू लागल्या आहेत. तेव्हापासून आतापर्यंत किमती जवळपास ७ टक्क्यांनी वाढल्या आहेत. १२ जून रोजी ब्रेंट क्रूडची किंमत ६९.३६ डॉलर प्रति बॅरल आणि डब्ल्यूटीआय क्रूडची किंमत ६६.६४ डॉलर प्रति बॅरल होती.

किमतींमध्ये झालेली वाढ तेलसमृद्ध क्षेत्रामधील संघर्षाच्या वाढत्या प्रमाणामुळे झाली आहे. अहवालानुसार, इस्रायलने इराणच्या ‘साउथ पारस गॅस फील्ड’वर हल्ला केला आहे, ज्यामुळे तेथील उत्पादन थांबवावे लागले आहे. विश्लेषकांच्या मते, जोपर्यंत होर्मुज सामुद्रधुनी बंद करण्याचा प्रयत्न होत नाही किंवा यमनमध्ये इराण समर्थित हूथी दहशतवाद्यांकडून जहाजांवर हल्ले होत नाहीत, तोपर्यंत कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता कमी आहे.

हेही वाचा..

१९८० नंतर रुमेटॉइड आर्थरायटीसच्या प्रकरणांमध्ये का वाढ होतेय…

आशीष चौहान यांनी पंतप्रधान मोदी यांचे का मानले आभार ?

त्वचारोग असो वा कोंडा, बघा प्रभावी उपाय काय ?

ईराणने डोनाल्ड ट्रम्प यांना मारण्याचा प्रयत्न केला !

ज्यूलियस बेयरचे अर्थशास्त्र आणि नेक्स्ट जनरेशन रिसर्चचे प्रमुख नॉर्बर्ट रकर यांनी सांगितले की, “तेल हा अशा संघर्षांचा सर्वात मोठा निर्देशक आहे आणि त्यामुळेच किमतींमध्ये उसळी आली आहे. परिस्थिती सतत बदलती आहे आणि येणाऱ्या दिवसांमध्ये याचा पुढील प्रभाव किती होईल, हे स्पष्ट होईल. इस्रायलची ही कारवाई अमेरिका आणि इराण यांच्यातील अणुकरारावरील चर्चा अयशस्वी होण्याच्या पार्श्वभूमीवर झाली आहे. त्याचबरोबर, जर इराणवर हल्ला झाला तर तो इराक व अन्य शेजारील देशांतील अमेरिकन तळांवर पलटवार करेल, असे तेहरानने स्पष्ट केले आहे.

एमके ग्लोबलच्या अहवालानुसार, इराण दररोज सुमारे ३.३ दशलक्ष बॅरल (एमबीपीडी) कच्च्या तेलाचे उत्पादन करतो आणि त्यातील सुमारे १.५ एमबीपीडी तेल निर्यात करतो. यामध्ये चीनचा वाटा ८० टक्के आहे, जो इराणचा प्रमुख तेल आयातदार आहे. इराण होर्मुज सामुद्रधुनीच्या उत्तरेकडील किनाऱ्यावर स्थित आहे, जिथून दररोज २० एमबीपीडी पेक्षा अधिक कच्च्या तेलाचा व्यापार होतो. होर्मुज सामुद्रधुनी ही मध्य पूर्वेतील एक अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाची शिपिंग मार्गिका आहे. या मार्गातून सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीसारखे देश देखील तेलाची वाहतूक करतात. यापूर्वीही इराणने ही सामुद्रधुनी बंद करण्याची धमकी दिली होती.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
299,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा