दादर येथील कबूतरखाना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर तो बंद करण्यात आला होता. मात्र, कबूतरांना दाणे घालण्यास परवानगी न मिळाल्याने नाराज झालेल्या जैन समाजाच्या नागरिकांनी आज सकाळी अचानक आंदोलन सुरू केले.
मिळालेल्या माहितीनुसार, जैन समाजातील महिला आणि पुरुषांनी कबूतरखान्यावर लावलेली ताडपत्री फाडली, जेणेकरून कबूतरांना दाणे खाता येईल. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत ही कारवाई थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावेळी थोडीशी झटापट झाली आणि काही लोकांनी तेथेच बसून आंदोलन सुरू केले.
या सगळ्या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणून शांतता प्रस्थापित केली आहे. जैन समाजाने स्पष्ट केले आहे की, पुढील न्यायालयीन सुनावणी होईपर्यंत कबूतरांना उपाशी ठेवू दिलं जाणार नाही. दरम्यान, राज्याचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सर्व पक्षांनी संयम ठेवावा आणि शासनाला सहकार्य करावे, असं आवाहन केलं आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी उद्या न्यायालयात होणार आहे.
हे ही वाचा :
‘या’ प्रकरणात राहुल गांधीना मिळाला जामीन!
मृत व्यक्तींच्या बँक खात्यांमधून पैसे मिळवण्याची प्रक्रिया सुलभ होणार







