33 C
Mumbai
Tuesday, February 3, 2026
घरविशेषबरेलीमध्ये मौलाना मोहसीन रझा यांच्या मालमत्तेवर बुलडोझर कारवाई!

बरेलीमध्ये मौलाना मोहसीन रझा यांच्या मालमत्तेवर बुलडोझर कारवाई!

पोलिसांकडून ५६ जणांना अटक

Google News Follow

Related

उत्तर प्रदेशातील बरेली शहरात ‘आय लव्ह मुहम्मद’ पोस्टर प्रकरणावरून उसळलेल्या वादाने हिंसक वळण घेतले असून, शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. २६ सप्टेंबर रोजी अला हजरत दर्गा आणि आयएमसीचे प्रमुख मौलाना तौकीर रझा खान यांच्या निवासस्थानाबाहेर लोकांचा एक गट पोस्टर फलकांसह जमला होता. या निदर्शनांदरम्यान काही आंदोलनकर्त्यांकडून दगडफेकही करण्यात आली, ज्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला.

याप्रकरणी पोलिसांनी मौलाना मोहसीन रझा यांना अटक केली असून, त्यानंतर उत्तर प्रदेश महानगरपालिकेने मंगळवारी (३० सप्टेंबर) त्यांच्या मालमत्तेवर बुलडोझर कारवाई सुरु केली. कारवाईचा व्हिडीओ देखील समोर आला आहे, ज्यामध्ये पोलिसांच्या बंदोबस्तात पालिकेचे बुलडोजर मौलाना मोहसीन रझा यांची मालमत्ता भुईसपाट करताना दिसत आहेत.

दरम्यान, शुक्रवारी झालेल्या नमाजानंतर निदर्शने अधिक तीव्र झाली, आणि त्यात हिंसक प्रकार घडल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर, बरेली शहरात मंगळवारी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. २६ सप्टेंबर रोजी झालेल्या घटनांनंतर शहरात सामाजिक सलोखा बिघडू नये म्हणून प्रशासन सतर्क असून, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे आणि काही भागांत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.

या प्रकरणात बरेली पोलिसांनी ५६ जणांना अटक केली आहे, ज्यात बरेली हिंसाचार प्रकरणातील प्रमुख सूत्रधार नदीम खानचा समावेश आहे. या कारवाईचे नेतृत्व करणारे बरेलीचे एसएसपी अनुराग आर्य यांनी पुष्टी केली की हिंसाचार भडकवण्यात सहभागी असलेल्या नदीमला पोलिसांनी अटक केली आहे.
हे ही वाचा : 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारच्या नमाजानंतर निदर्शक ‘आय लव्ह मोहम्मद’ असे फलक घेऊन अला हजरत दर्गा आणि आयएमसीचे प्रमुख मौलाना तौकीर रझा खान यांच्या घराबाहेर जमले होते. निदर्शनांदरम्यान त्यांनी दगडफेक केली आणि पोलिसांशी चकमक झाली. या चकमकीत अनेक जण जखमी झाले आणि सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, व्हॉट्सअॅपवरील चिथावणीखोर संदेशांमुळे निदर्शकांना भडकावण्यात आले होते.
National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
290,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा