24 C
Mumbai
Friday, December 12, 2025
घरविशेषरत्नागिरी जिल्ह्यातील ५० मंदिरांमध्ये ड्रेस कोड लागू!

रत्नागिरी जिल्ह्यातील ५० मंदिरांमध्ये ड्रेस कोड लागू!

वस्त्रसंहितेबाबत गणपतीपुळे मंदिर प्रशासनाकडून अद्याप निर्णय नाही

Google News Follow

Related

रत्नागिरीतील ५० मंदिरांमध्ये ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. कोकणात पर्यटनासाठी आणि देवदर्शनासाठी अनेक पर्यटक-भाविक जात असतात.मात्र भाविकांना आता देवदर्शासाठी जाण्यासाठी कपडे परिधान करण्या संदर्भातले नियम पाळावे लागणार आहेत.या नियमानुसार अशोभनीय किंवा तोकडे कपडे घालण्यास भाविकांवर बंदी असणार आहे.वस्त्रसंहितेबाबत गणपतीपुळे मंदिर प्रशासनासोबत बोलणी झालेली असून त्यांचा निर्णय देखील पुढील काही दिवसांमध्ये कळणार असल्याची माहिती समोर आली आहे.

काही महिन्यांपासून राज्यातील मंदिर, धार्मिक स्थळावर ड्रेस कोड लागू करण्याबाबत चर्चा सुरू झाल्या होत्या. काही ठिकाणी याची अंमलबजावणी झाली होती. तर, काही ठिकाणी हे नियम शिथील करण्यात आले होते.त्यानुसार आता रत्नागिरी जिल्ह्यातही ५० मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे.यामुळे आता भाविकांना देखील या नियमांचे पालन करावे लागणार आहे अन्यथा त्यांना मंदिरात प्रवेश मिळणार नाही.तशा प्रकारचे बोर्ड जिल्ह्यातल्या या मंदिरांच्या बाहेर लावण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक सुनील घनवट यांनी दिली आहे. गणपतीपुळे मंदिरासोबत देखील याबाबत बोलणे झालेले आहे. पण वस्त्रासहितेबाबत गणपतीपुळे मंदिर प्रशासन अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. काही दिवसांमध्ये या संदर्भातला निर्णय अपेक्षित असल्याची माहिती घनवट यांनी दिली आहे.

हे ही वाचा:

अंतरवली सराटीमधील दगडफेकीच्या घटनेतील मुख्य आरोपीला ठोकल्या बेड्या

ट्रॉफीवर पाय ठेवल्याने मार्शवर शामीची टीका!

नरेंद्र मोदींची अवकाशभरारी!

एनआयएच्या कारवायांमुळे काश्मीरमधील दहशतवादी हवालदिल!

रत्नागिरी जिल्ह्यातील खालील मंदिरांनी वस्त्रसंहिता लागू केली आहे.
१. ग्रामदेवता श्री नवलाई मंदिर, नाचणे, ता. रत्नागिरी
२. श्री साई मंदिर, गोडाऊन स्टॉप, नाचणे, ता. रत्नागिरी
३. श्री विश्वेश्वर मंदिर, पिंपळवाडी, नाचणे, ता. रत्नागिरी
४. श्री नवलाई मंदिर, पिंपळवाडी, नाचणे, ता. रत्नागिरी
५. श्री ज्योतिबा मंदिर, पेठ किल्ला, रत्नागिरी
६. श्री स्वयंभू काशीविश्वेश्वर देवस्थान, राजिवडा, रत्नागिरी
७. श्री दत्त मंदिर खालची आळी, रत्नागिरी
८. श्री मारुती मंदिर संस्था ( दक्षिणाभिमुख मारुती मंदिर), मारुती मंदिर, रत्नागिरी
9. श्री साई मंदिर, मोडेवाडी, मिरजोळे, ता. रत्नागिरी
१०. श्रीकृष्ण मंदिर, श्री महापुरुष मंदिर, वरचीवाडी, मिरजोळे, ता. रत्नागिरी
११. श्री लक्ष्मीकांत मंदिर, लक्ष्मीकांत वाडी, मिरजोळे, ता. रत्नागिरी
१२. श्रीराम मंदिर, पावस, ता. रत्नागिरी
१३. श्री अंबा माता मंदिर, श्री मरुधर विष्णू समाज सभागृह, रत्नागिरी
१४. श्री विठ्ठल राम पंचायतन मंदिर, राजापूर
१५. श्री निनादेवी मंदिर, राजापूर,
१६ . श्री कामादेवी मंदिर, राजापूर
१७. श्री लक्ष्मीनारायण मंदिर, गुजराळी, राजापूर
१८. श्री चव्हाटा मंदिर, जवाहर चौक, राजापूर
१९. श्री महाकाली मंदिर, आडिवरे, ता. राजापूर
२०. श्री कनकादित्य मंदिर, कशेळी, ता. राजापूर
२१. श्रीसत्येश्र्वर मंदिर, कशेळी, ता. राजापूर
२२. .श्री जाकादेवी मंदिर, कशेळी, ता. राजापूर
२३. श्री स्वामी समर्थ मठ, उन्हाळे, ता. राजापूर
वस्त्रसंहिता फलक
२४. श्री गणेश मंदिर, मावळत वाडी, कालुस्ते, ता. चिपळूण
२५. श्री हनुमान मंदिर, कुंभार वाडी, भिले, ता. चिपळूण
२६. श्री देव सिध्देश्वर मंदिर (सिध्देश्वर प्रतिष्ठान), भिले, ता. चिपळूण
२७. श्री देव महादेव भानोबा कालेश्री देवस्थान भिले -धामेली ट्रस्ट, भिळे-धामेली, ता. चिपळूण
२८. श्री लक्ष्मीकांत देवस्थान, गांग्रई, ता. चिपळूण
२९. श्री विठ्ठल रखुमाई मंदिर, गांग्रई, ता. चिपळूण
३०. श्री दत्त मंदिर, दत्तवाडी, गांग्रई, ता. चिपळूण
३१. श्री खेम वाघजाई मंदिर, ग्रामदैवत, बिवली-करंबवणे ग्रामदैवत, ता. चिपळूण
३२. श्री गणेश उत्कर्ष मंडळ, बांद्रेवाडी, मालदोली, ता. चिपळूण
३३. श्री देव जुना कालभैरव मंदिर, चिपळूण
३४. श्री विंध्यवासीनि मंदिर, रावतळे, चिपळूण
३५. श्री शिव मंदिर, चिपळूण
३६. श्री काळेश्री मंदिर, कान्हे, ता. चिपळूण
३७.श्री हनुमान मंदिर, पिंपळी, ता. चिपळूण
३८. श्री हनुमान मंदिर, पेढांबे, ता. चिपळूण
३९. श्री गणेश मंदिर, नांदिवसे, ता. चिपळूण
४०. श्री रामवरदायिनी मंदिर,दादर, ता. चिपळूण
४१. श्री मुरलीधर मंदिर, चिपळूण
४२. श्री रामवरदायिनी मंदिर देवस्थान ट्रस्ट, मजरे दादर(दसपटी ), ता. चिपळूण
४३. श्री चंडिका माता मंदिर, गणपतीपुळे
४४. श्री सोमेश्वर सूंकाई एन्डोमेंट ट्रस्ट, सडये, पिरंदवणे, ता. रत्नागिरी
४५. श्री अंबामाता मंदिर, श्री मरुधर विष्णू समाज, रत्नागिरी.
४६. श्री परशुराम मंदिर, परटवणे, रत्नागिरी
४७. स्वयंभू श्री महालक्ष्मी देवस्थान न्यास, कारवांचीवाडी, रत्नागिरी

यातील दोन म्हणजे आडिवरे येथील महालक्ष्मी मंदिर आणि कशेळी येथील कणकादित्य मंदिर ही आहेत. मंदिराकडून हा निर्णय मान्य केलेला असल्याची माहिती आहे. तसेच गणपतीपुळे मंदिर प्रशासनासोबत बोलली झालेली आहे. त्यांचा निर्णय देखील पुढील काही दिवसांमध्ये कळणार असल्याची माहिती आहे.

 

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा