30 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
घरविशेषएनआयएच्या कारवायांमुळे काश्मीरमधील दहशतवादी हवालदिल!

एनआयएच्या कारवायांमुळे काश्मीरमधील दहशतवादी हवालदिल!

दहशतवाद्यांकडून निधीसाठी शोधाशोध

Google News Follow

Related

राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएच्या कठोर कारवायांमुळे जम्मू काश्मीरमधील दहशतवाद्यांना मिळणारा निधी आटला आहे. असे असले तरी दहशतवाद्यांकडून निधी मिळवण्यासाठी क्रिप्टो करन्सी, बिटकॉइन आणि ड्रोनच्या साह्याने शस्त्रे व पैसे पाठवण्यासह अन्य प्रकारांचा वापर केला जात असल्याने तपास संस्थांसमोरील आव्हाने वाढली आहेत.

निधी मिळवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या या नव्या क्लृप्त्यांच्या पार्श्वभूमीवर तपास संस्थांकडून सायबर तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे. ईडी, सीबीआय, राज्य तपास संस्था आणि अन्य कायद्याशी संबंधित संस्था एकजूट होऊन दहशतवाद्यांचे जाळे उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहेत. तरीही लश्कर आणि जैशचे दहशतवादी नव्या क्लृप्त्यांचा वापर करत आहेत. एकीकडे मिठाईचे डबे आणि ड्रोनमार्फत पैसे पाठवण्याचा प्रयत्न नेस्तनाबूत केला जात आहे. त्याचवेळी ई-मनी पकडण्याचे आव्हान समोर आहे. सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या माध्यमांतून मिळालेल्या पैशांचा वापर दहशतवादी संघटनांना निधी पुरवण्यासाठी करत आहेत.

हे ही वाचा:

अंतरवली सराटीमधील दगडफेकीच्या घटनेतील मुख्य आरोपीला ठोकल्या बेड्या

बदनामीची धमकी देत माजी सैनिकाकडून पावणेचार लाख रुपये उकळले

गाडीमध्येच गोळ्या झाडलेल्या भारतीय तरुणाचा अमेरिकेत मृत्यू!

‘पंतप्रधान मोदी यांनी धीर दिल्यामुळे आमचा आत्मविश्वास वाढला’

५००हून अधिक मालमत्ता जप्त
काही दिवसांपूर्वीच तपास संस्थांनी विविध जिल्ह्यांत दहशतवादी, त्यांच्या समर्थकांशी संबंधित शेकडो कोटी किंमतीच्या ५०० मालमत्ता जप्ता केल्या आहेत. एनआयएने सन २०२२मध्ये दहशतवाद्यांना निधी दिल्याशी संबंधित १०५ गुन्हे दाखल केले आहेत. ८७६ आरोपींविरोधात ९४ आरोपपत्र दाखल करण्यात आले आहेत. आतापर्यंत ७९६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यातील १०० आरोपी दोषीही ठरले आहेत. अशा प्रकरणांत एनआयएचे दोषसिद्धीचे प्रमाण ९३ टक्क्यांहून अधिक झाले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
151,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा