32 C
Mumbai
Monday, May 20, 2024
घरक्राईमनामागाडीमध्येच गोळ्या झाडलेल्या भारतीय तरुणाचा अमेरिकेत मृत्यू!

गाडीमध्येच गोळ्या झाडलेल्या भारतीय तरुणाचा अमेरिकेत मृत्यू!

हल्ल्याचे कारण अद्याप अस्पष्ट

Google News Follow

Related

सिनसिनाटी विद्यापीठात पीएचडीचे शिक्षण घेणाऱ्या भारतीय तरुणावर काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील ओहिया भागात तो गाडीत असताना गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. या २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे.आदित्य अदलखा असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याच्यावर ९ नोव्हेंबर रोजी गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्यानंतर १८ नोव्हेंबर रोजी रुग्णालयात उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.

वेस्टर्न हिल्स वियाडक्क येथील भिंतीवर आदित्यच्या गाडीने धडक दिली होती. आदित्यला स्वतःला गोळ्या लागल्या होत्या. स्थानिकांनी ९ नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजून २० मिनिटांनी बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज ऐकला होता. त्यानंतर गाडी ठिकठिकाणी धडकली. चालकाच्या बाजूच्या खिडकीच्या काचेवर तीन गोळ्यांची छिद्रेही दिसत आहेत. आदित्यला लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती गंभीर होती. त्यानंतर १८ नोव्हेंबरला त्याला मृत घोषित करण्यात आले.
आदित्यचे मित्र आणि त्याचे विद्यापीठातील सहकारीही या घटनेने हादरले आहेत. विद्यापीठाचे कुलगुरू अँड्र्यू फिलाक यांनीही आदित्यसारख्या हुषार विद्यार्थ्याच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे.

हे ही वाचा:

आठ माजी नौदल कर्मचाऱ्यांच्या मृत्युदंडाच्या शिक्षेविरोधातील भारताचे अपील कतारने स्वीकारले!

रश्मिका मंदानाच्या डीपफेक व्हिडीओप्रकरणी महत्त्वाचे धागेदोरे हाती!

“एक मिलियन डॉलर बिटकॉईन द्या, नाहीतर टर्मिनल २ उडवणार” मुंबई विमानतळाला धमकीचा ईमेल

सचिन वाझेला तुरुंगात हवेय मांजराचे पिल्लू

आदित्यने सन २०१८मध्ये दिल्ली विद्यापीठाच्या रामजास कॉलेजमधून प्राणीशास्त्रामधून पदवी प्राप्त केली होती. त्यानंतर त्याने ऑल इंडिया मेडिकल सायन्समधून सन २०२०मध्ये फिजिओलॉजी विषयात मास्टर्स पदवी मिळवली होती. त्यानंतर त्याने पीएचडीसाठी सिनसिनाटी विद्यापीठात प्रवेश घेतला. त्याला सन २०२५मध्ये पीएचडी मिळाली असती. त्याच्यावरील हल्ल्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. तसेच, हल्ल्याची घटना झाल्यापासून अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
154,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा