28.9 C
Mumbai
Wednesday, October 21, 2026
घरविशेषसचिन वाझेला तुरुंगात हवेय मांजराचे पिल्लू

सचिन वाझेला तुरुंगात हवेय मांजराचे पिल्लू

मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष एनआयए कोर्टात अर्ज

Google News Follow

मुंबई पोलीस दलातील बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे हा सध्या तुरुंगात आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील त्यांचे निवास्थान अँटिलिया या घराबाहेर स्फोटके ठेवल्याप्रकरणी सचिन वाझे आरोपी आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या १०० कोटींच्या कथित आर्थिक अफरातफर प्रकरणात सचिन वाझे आरोपी आहे.

दरम्यान, सचिन वाझे याच्याबद्दल नवी माहिती समोर आली आहे. मांजरीचे पिल्लू दत्तक घेण्यासाठी सचिन वाझे याने न्यायालयात अर्ज केला आहे. सचिन वाझे सध्या तुरुंगात ज्या कोठडीत आहे, त्या कोठडीतील मांजराचे पिल्लू आजारी पडले आहे. हे पिल्लू दत्तक घेण्यासाठी सचिन वाझे याने न्यायालयात अर्ज केला आहे. मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष एनआयए कोर्टात त्याने अर्ज केला असून सचिन वाझे याच्या मागणीनंतर न्यायालयाने तुरुंग प्रशासनाला उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

सचिन वाझे याला येरवडा कारागृहातील आजारी मांजरीचे पिल्लू दत्तक घ्यायचे आहे. सचिन वाझे याने या मांजरीच्या पिल्लाचे नामकरण केले असून त्याला ‘झुमका’ असे नाव दिले आहे. या पिल्ल्याची काळजी घेणे गरजेचे आहे. आपण त्याला दत्तक घेऊ इच्छित असल्याचे त्याने आपल्या अर्जात म्हटले आहे. हे मांजरीचे पिल्लू दत्तक घेण्यासाठी न्यायालयाची परवानगी मागणारी दोन पानांची हस्तलिखित याचिका सचिन वाझे याने सादर केली आहे. गुरुवारी सचिन वाझे याला अँटिलिया बॉम्ब स्फोटक खटल्याच्या सुनावणीच्या वेळी विशेष एनआयए न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. त्यावेळी त्याने ही मागणी केली.

हे ही वाचा:

प्रकाश राज यांना १०० कोटी रुपयांच्या घोटाळयाप्रकरणी ईडीचे समन्स

अंधारेबाईना अचानक का आला भुजबळांचा कळवळा?

डीपफेक लोकशाहीसाठी नवा धोका; आळा घालण्यासाठी नियमन करणार

इस्लामविरोधी भूमिका घेणाऱ्यांच्या हाती नेदरलँडची सत्ता?

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर बॉम्ब स्फोटक ठेवल्याचा आरोप सचिन वाझे याच्यावर आहे. तसेच मनसुख हिरेन हत्या प्रकरणात महत्वाचे पुरावे नष्ट केल्याचाही आरोप आहे. मुंबईतील माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुंबईतील बार अँड रेस्टॉरंट मालकांकडून शंभर कोटी वसुली करण्याचे टार्गेट निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिल्याचा आरोप केला होता. या सर्व प्रकरणात सचिन वाझे एनआयए कोठडीत आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा