32 C
Mumbai
Friday, May 10, 2024
घरदेश दुनियाइस्लामविरोधी भूमिका घेणाऱ्यांच्या हाती नेदरलँडची सत्ता?

इस्लामविरोधी भूमिका घेणाऱ्यांच्या हाती नेदरलँडची सत्ता?

एक्झिट पोलमध्ये कट्टर उजव्या विचारसरणीचे नेते गीर्ट वाइल्डर्स यांना कौल

Google News Follow

Related

देशात पाच राज्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना नेदरलँडच्या निवडणुकीकडेही लक्ष लागून राहिले आहे. नेदरलँड देशाच्या एक्झिट पोलमध्ये कट्टर उजव्या विचारसरणीचे नेते गीर्ट वाइल्डर्स यांच्या पक्षाने विजय मिळवला आहे. गीर्ट यांच्या फ्रीडम पार्टीला ३७ जागा मिळाल्या आहेत. तर विरोधकांना २५ जागा मिळाल्या आहेत. यापूर्वी हा फरक केवळ दोन जागांचाच असायचा यामुळे हा विजय खूप महत्वाचा मानला जात आहे.

सध्या तरी हा एक्झिट पोल असला तरी मोठ्या बदलाची अपेक्षा असल्याचे सांगण्यात येत आहे. शिवाय गीर्ट सत्तेत आले तर युरोपमध्ये वेगळाच ट्रेंड सुरु होण्याची शक्यता आहे. गीर्ट यांना इस्लामविरोधी कठोर भूमिका घेणारा नेता म्हणून ओळखले जाते. भारतात जेव्हा नुपूर शर्मा यांनी पैगंबर मोहम्मद यांच्यावर टिप्पणी केली होती, तेव्हा मोठा वाद झाला होता. त्यावेळी गीर्ट यांनी नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याचे उघडपणे समर्थन केले होते.

नुपूर शर्मा यांच्या विधानानंतर भारतात देखील खळबळ उडाली होती. शिवाय अरब देशही नुपूर शर्मा आणि भारताच्या विरोधात उभे होते. तेव्हा गीर्ट वाइल्डर्स यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर उघडपणे समर्थनार्थ भूमिका घेत त्यांचा बचाव केला होता. सध्या नेदरलँडही स्थलांतरितांच्या मुद्द्याचा सामना करत आहे. त्यांचा लोंढा थोपविण्याची शपथ गीर्ट यांनी घेतली होती, त्याचा फायदा त्यांना झाल्याचे दिसत आहे.

हे ही वाचा:

वित्त आयोगाकडून मंजूर निधी प्राप्त करण्यासाठी कार्यवाही करावी

मोसाद निघणार हमास दहशतवाद्यांच्या शोधात!

‘भारत-कॅनडामधील संबंध सुधारू लागले’!

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी संबंध; चार सरकारी कर्मचाऱ्यांची हकालपट्टी!

नुपूर शर्मा प्रकरणात अरब देश भारताला विरोध करत असताना वाइल्डर्सने या देशांना धारेवर धरले होते. भारताबद्दल किंवा इतर कोणत्याही देशाबद्दल तुम्हाला काय वाटते हे ठरविण्यापूर्वी स्वतःला आरशात पहा. हे देश भारतावर हल्ले करत आहेत, जे शरिया कायद्याला लोकशाही आणि मानवी हक्कांपेक्षा वरचे स्थान देतात. हे देश सर्वात असहिष्णु आहेत, असा आरोप गीर्ट यांनी केला होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
151,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा