24 C
Mumbai
Saturday, January 24, 2026
घरविशेषदिल्ली पोलिसांनी मोठा दहशतवादी कट उधळला; आयएस-प्रेरित मॉड्यूल उद्ध्वस्त

दिल्ली पोलिसांनी मोठा दहशतवादी कट उधळला; आयएस-प्रेरित मॉड्यूल उद्ध्वस्त

रसायने, इलेक्ट्रॉनिक वस्तू घेतल्या ताब्यात

Google News Follow

Related

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने समन्वित कारवायांतून दिल्ली, रांची आणि इतर ठिकाणांवरून तब्बल डझनभर संशयितांना ताब्यात घेतले आहे. हा गट इस्लामिक स्टेट (IS) प्रेरित मॉड्यूल असल्याचे पोलिसांनी सांगितले. बुधवारी उशिरापर्यंत पाच संशयितांना अटक करण्यात आली असून, इतरांची चौकशी सुरू आहे.

पोलिसांनी ज्यांना ताब्यात घेतले आहे त्यात अबू बकर उर्फ सुफ़ियान आणि आफताब हे दोघे मुंबईहून दिल्लीला आले होते आणि सराय काले खान परिसरातून ताब्यात घेण्यात आले. दानिशला रांचीहून अटक करण्यात आली असून तो बोकारो जिल्ह्याचा रहिवासी आहे. इंग्रजी पदवीधर असल्याचा त्याचा दावा आहे. तो मागील १८ महिन्यांपासून एका लॉजमध्ये राहत होता.

जप्त साहित्य

कारवाईदरम्यान पोलिसांनी स्फोटके तयार करण्यासाठी लागणारे रसायने आणि इतर साहित्य जप्त केले. हायड्रोक्लोरिक ॲसिड, नायट्रिक ॲसिड, सोडियम बायकार्बोनेट, सल्फर पावडर pH व्हॅल्यू चेकर, बॉल बेअरिंग्ज, चार चाकू, वजनकाटा, बेकर्स सेट, सेफ्टी ग्लोव्हज, मास्क, ₹१०,५०० रोकड, इलेक्ट्रॉनिक साहित्य: स्ट्रिप वायर, सर्किट, मदरबोर्ड, डायोड्स, कॉपर इत्यादि सामान या आरोपींकडे सापडले आहे.

हे ही वाचा:

 

एन्क्रिप्टेड नेटवर्कवर संपर्क

संशयित सिग्नल आणि टेलिग्रामसारख्या एन्क्रिप्टेड ॲपवर हे आरोपी संपर्कात होते. त्यांनी ‘गझवा-ए-हिंद’ नावाचा गट तयार केला होता. या संकल्पनेनुसार भारतीय उपखंडात इस्लामी राजवट स्थापण्याचा हेतू होता. चौकशीत समोर आले की, त्यांचा हँडलर ISI ऑपरेटिव्ह असून तो IS भरतीदार म्हणून वावरत होता.

पोलिस व गुप्तचर विभागाने ही यशस्वी कारवाई केली आहे. केंद्रीय गुप्तचर संस्थेकडून अलर्ट आल्यानंतर स्पेशल सेलने सापळे रचले. दिल्ली, मुंबई, रांचीसह अनेक शहरांत एकाचवेळी धाडसत्र सुरू झाले. झारखंड ATS सोबत मिळून पलामूमध्येही छापे टाकण्यात आले. तपासात उघडकीस आले की, संशयितांना ऑनलाईन IED बनवण्याचे प्रशिक्षण दिले जात होते.

गुन्हा दाखल

दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात आता एफआयआर नोंदवला आहे. आरोपांमध्ये म्हटले आहे की, धार्मिक वैमनस्य पसरवणे, सामाजिक सौहार्द बिघडवणे, बेकायदा शस्त्रे बाळगणे, यांचा समावेश आहे. जप्त डिजिटल उपकरणे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवली आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा