28.7 C
Mumbai
Friday, October 23, 2026
घरविशेष‘ऑपरेशन सिंदूर’नंतर ब्रह्मोसची मागणी वाढली

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर ब्रह्मोसची मागणी वाढली

रशियालाही क्षेपणास्त्र पुरवण्याबाबत चर्चा

Google News Follow

‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान प्रत्यक्ष युद्धात वापर झाल्यानंतर भारताच्या ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ब्रह्मोस एअरोस्पेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) डॉ. जैतीर्थ आर. जोशी यांनी एका विशेष मुलाखतीत ही माहिती दिली. क्षेपणास्त्राची अचूक मारा करण्याची क्षमता, शत्रूच्या रडारला चकवा देण्याची क्षमता आणि विविध प्रकारच्या लष्करी प्लॅटफॉर्मवरून प्रक्षेपण करण्याची सुविधा यामुळे अनेक देशांचे लक्ष ब्रह्मोसकडे वेधले गेले आहे.

‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये ब्रह्मोसचा प्रत्यक्ष वापर हा या क्षेपणास्त्रासाठी महत्त्वाचा टप्पा ठरला. भारतीय हवाई दलाने सुखोई-३० एमकेआय लढाऊ विमानांवरून ब्रह्मोस क्षेपणास्त्रे डागून पाकिस्तानमधील हवाई तळ आणि महत्त्वाच्या लष्करी ठिकाणांना लक्ष्य केले. या कारवाईत क्षेपणास्त्राने अचूक लक्ष्यभेद केल्याचे आणि शत्रूच्या रडारला चकवा दिल्याचे जोशी यांनी सांगितले. प्रत्यक्ष युद्धातील कामगिरीमुळे ब्रह्मोसच्या क्षमतेबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा वाढल्याचेही त्यांनी नमूद केले.

ब्रह्मोस एरोस्पेस हे क्षेपणास्त्र पूर्णपणे स्वदेशी बनवण्यासाठी आणि त्याच्या क्षमता वाढवण्यासाठी काम करत आहे, असे जोशी म्हणाले. हे क्षेपणास्त्र सुरुवातीला नौदलासाठी विकसित करण्यात आले, त्यानंतर लष्करासाठी जमिनीवरून मारा करणारी आवृत्ती आणि सुखोई लढाऊ विमानांसाठी हवेतून मारा करणारी आवृत्ती तयार करण्यात आली. सध्या कंपनीचे पिलानी, नागपूर आणि लखनौ येथे तीन उत्पादन युनिट्स असून, त्यांना ३०० हून अधिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचे (एमएसएमई) पाठबळ आहे, असे जोशी म्हणाले.

फिलिपिन्सनंतर व्हिएतनाम, इंडोनेशियाकडून मागणी

फिलिपिन्स हा ब्रह्मोसचा पहिला परदेशी ग्राहक ठरला. त्यानंतर व्हिएतनाम आणि इंडोनेशियानेही या क्षेपणास्त्रात रस दाखवला असून, भारताच्या संरक्षण निर्यात क्षेत्रासाठी हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. भारताने संरक्षण उत्पादनांच्या निर्यातीला चालना देण्याच्या प्रयत्नांत ब्रह्मोसला प्रमुख स्थान दिले आहे.

हे ही वाचा:

नकारात्मक राजकारणाच्या जोरावर विरोधकांना ३० वर्षे सत्ता मिळणार नाही!

“भाजप सत्तेत असेपर्यंत भारतात पाऊल ठेवणार नाही”

रेहान वाड्राच्या प्रदर्शनातून आंदोलनांचे फोटो हटवले

सुटका होताच सौरव दास, आशुतोष रांकाला क्राईम ब्रँचने बोलावले

रशियालाही ब्रह्मोस पुरवण्याबाबत चर्चा

ब्रह्मोस हे भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) आणि रशियाच्या एनपीओ मशिनोस्ट्रोयेनिया या संस्थेने संयुक्तपणे विकसित केलेले क्षेपणास्त्र आहे. आता रशियाच्या सशस्त्र दलांनाही ब्रह्मोस पुरवण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे जोशी यांनी सांगितले. यासाठी भारत आणि रशिया यांच्यात आंतरसरकारी कराराच्या चौकटीत चर्चा होत आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा