29 C
Mumbai
Thursday, December 5, 2024
घरविशेषउपमुख्यमंत्री अजित पवारांना कोर्टाकडून समन्स, १६ डिसेंबरला हजर राहण्याचे निर्देश!

उपमुख्यमंत्री अजित पवारांना कोर्टाकडून समन्स, १६ डिसेंबरला हजर राहण्याचे निर्देश!

माजी आयपीएस अधिकारी सुरेख खोपडे यांनी दिली माहिती

Google News Follow

Related

उपमुख्यमंत्री अजित पवारांना बारामती कोर्टाकडून समन्स बजावण्यात आला आहे. २०१४ च्या निवडणुकांमध्ये केलेल्या एका वक्तव्यामुळे बारामतीच्या कोर्टाकडून समन्स बजावण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांविरुद्ध माजी  आयपीएस अधिकारी सुरेख खोपडे यांनी याचिका दाखल केली होती. या प्रकरणी त्यांना आता बारामती कोर्टाकडून हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

२०१४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये प्रचार करताना अजित पवार यांनी गावकऱ्यांना ही दमदाटी केल्याची माहिती आहे. सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी अजित पवार बारामतीमधील मासाळवाडी गावाचा दौरा केला होता. त्यावेळी गावात पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण झाला होता. तेव्हा अजित पवारांनी, ‘सुप्रिया सुळे यांना मतदान केलं नाही तर गावचं पाणी बंद करु. तुमचा दोन महिन्यात पाणीप्रश्न सोडवतो.. आम्हालाच मतदान करा… अशी दमदाटी अजित पवारांनी केली, असा आरोप बारामतीमधील गावकऱ्यांचा आहे.

अजित पवारांच्या वक्तव्या विरोधात माजी आयपीएस अधिकारी सुरेख खोपडे यांनी याचिका दाखल होते. सुरेश खापडे हे २०१४ मध्ये आप पक्षाचे उमेदवार होते. त्यावेळी देखील त्यांनी यासंदर्भात तक्रार केली होती. त्यानुसार बारामती कोर्टाने अजित पवारांना हे समन्स बजावले आहे. तसेच त्यांना १६ नोव्हेंबर रोजी कोर्टात हजर राहण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

हे ही वाचा : 

गयाना देशाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान!

पुतीन यांचे गुरू म्हणतात, भारताच्या प्राचीन वैदिक परंपरा, संस्कृतीत जगाला नवी दिशा देण्याची क्षमता

अखिलेश यादवांनी खोटा व्हिडीओ केला शेअर

भाजपला मतदान करणार होती म्हणून तिची हत्या केली

 

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
207,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा