29 C
Mumbai
Monday, December 29, 2025
घरविशेषउपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, बांबू पण लावलेत आम्ही...

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, बांबू पण लावलेत आम्ही…

नाव न घेता उद्धव ठाकरेंवर टीका

Google News Follow

Related

मुख्यमंत्री पदावरून उपमुख्यमंत्री झालो यामध्ये काही फरक पडलेला नाही. काम करणाऱ्याला काही फरक पडत नाही. मग सारखे सारखे गावाला का जाता? यावर उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, गाव आहे, गावाचा मला अभिमान आहे, काही लोकांना घर सुटत नाही ते लोक माझ्यावर आरोप करतात.

एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी हे वक्तव्य केले आहे. यावेळी नाव न घेता त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. विधानसभा निवडणुकीत महायुतीला यश मिळाल्यानंतर दुसऱ्यांदा महायुतीचे सरकार स्थापन झाले. मात्र, त्यावेळी असलेले मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आपआपली जागा बदलत कारभाराला सुरुवात केली. परंतु, मुख्यमंत्री पदावरून उपमुख्यमंत्री मिळाल्याने शिंदे नाराज असल्याची चर्चा होऊ लागली, यामुळे ते सतत आपल्या गावी जात असल्याच्या बातम्या समोर आल्या. या घटनेमुळे विरोधकांनी त्यांच्यावर निशाणा साधत टीका केली. यावर आता उपमुख्यमंत्री शिंदेनी स्वतः स्पष्टीकरण देत विरोधकांवर निशाणा साधला आहे.

हे ही वाचा : 

औषधी गुणधर्मांनी युक्त ‘जव’… आहारात आणि उपचारातही!

उरी, पुलवामा हल्ल्याचा बदला घेऊन पंतप्रधान मोदींनी भारताला इस्रायल, अमेरिकेच्या यादीत आणले

गेल्या वर्षी अमेरिकेतून २९७ प्राचीन वस्तू भारतात आणल्या…

बांगलादेश: हिंदू देवतांच्या विरुद्ध आक्षेपार्ह टिप्पणी, विद्यापीठातील हिंदू विद्यार्थ्यांकडून निदर्शने!

ते म्हणाले, शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे मी गावी गातो. गावी गेलो कि माझे पाय आपोआप शेताकडे वळतात. तिकडे वेगवगळ्या प्रकारच्या वृक्षारोपण केले गेले आहे. स्ट्रॉबेरी, सफरचंद, अवाकाडू, अगरवूड आमच्या मातीमध्ये काहीही उगते. काही लोक म्हणाले शेतीकरण्यासाठी हेलिकॉप्टरने जातात, पण गाडीने गेलो कि सात ते आठ तास जातील. यावेळेत मी विविध कामांकरीता दहा हजार सह्या करू शकतो. जगाच्या पाठीवर मी असा व्यक्ती आहे कि गर्दीमध्येसुधा कामासाठी आलेल्या व्यक्तीच्या पाठीवर सही करतो.

ते पुढे म्हणाले, गावातील इतर लोकांना क्लस्टर शेतीसाठी प्राध्यान्य द्यायला लावले आहे. सर्व प्रकारची शेती होते तिकडे, ५०० प्रकारच्या दुर्मिळ औषधी वनस्पती आहे तिकडे, मसाले होतात. बांबू पण लावलेत आम्ही. म्हणजे बांबूची शेती लावली.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
285,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा