22 C
Mumbai
Thursday, January 29, 2026
घरविशेषभारतीय तरुण स्टार्टअप, एआय क्षेत्रात व्यस्त; "निषेधासाठी त्यांच्याकडे वेळ नाही!"

भारतीय तरुण स्टार्टअप, एआय क्षेत्रात व्यस्त; “निषेधासाठी त्यांच्याकडे वेळ नाही!”

देवेंद्र फडणवीसांकडून राहुल गांधींना सणसणीत टोला

Google News Follow

Related

नेपाळमधील अराजकतेनंतर भारतातही अशी परिस्थिती उद्भवू शकते अशी शक्यता अनेक विरोधी पक्षातील नेत्यांनी केली होती. यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. इंडिया टुडेच्या कॉनक्लेव्हमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला. राहुल गांधींच्या जनरल-झेड प्रश्नाचे उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भारत आणि नेपाळमधील परिस्थिती वेगळी आहे. ज्यांना नेपाळवर खूप प्रेम आहे त्यांनी नेपाळमध्येच राहावे. ते असेही म्हणाले की, भारतातील तरुणांकडे निषेधासाठी वेळ नाही कारण ते स्टार्टअप्स, एआय आणि आयटी सारख्या क्षेत्रात काम करत आहेत.

देवेंद्र फडणीस यांनी अधोरेखित केले की, तरुण भारतीय अभियंत्यांनी जागतिक स्तरावर स्वतःचे नाव कमावले आहे. ते सिलिकॉन व्हॅलीमध्ये दिसतात. राहुल गांधींनी सर्व युक्त्या वापरून पाहिल्या आहेत आणि ते हताश आहेत. आता त्यांना वाटते की ते जनरल-झेडला आवाहन करून काहीतरी साध्य करू शकतात. जनरल झेडला केलेले त्यांचे आवाहन काम करणार नाही, असे फडणवीस म्हणाले. भारतातील तरुणांकडे निषेध करण्यासाठी वेळ नाही. ते स्टार्टअप्स, एआय आणि आयटी सारख्या क्षेत्रात काम करत आहेत, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “भारताने प्रचंड प्रगती केली आहे आणि तो जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. आपल्या देशातील तरुणांची मानसिकता वेगळी आहे आणि ते जगात आपले वर्चस्व प्रस्थापित करत आहेत; त्यांच्याकडे रस्त्यावर उतरून निषेध करण्यासाठी वेळ नाही.” राहुल गांधी यांनी अलीकडेच देशातील विद्यार्थी आणि तरुणांना, १९९७ ते २०१२ दरम्यान जन्मलेल्या जनरल- झेड गटाला, देशाच्या लोकशाहीचे रक्षण करण्याचे आवाहन केले होते. त्यांनी देशातील मत चोरीच्या समस्येवर लक्ष केंद्रित करण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केले.

हे ही वाचा : 

“भारताला शिक्षा करायची नाही, पण…” अमेरिकेचे ऊर्जा सचिव काय म्हणाले?

रेल्वेवरून डागता येणार क्षेपणास्त्र; ‘अग्नी-प्राईम’ची यशस्वी चाचणी

लेहमधील हिंसक आंदोलनासाठी सोनम वांगचुक जबाबदार!

‘आय लव्ह महादेव’ पोस्टवरून गुजरातमध्ये संघर्ष, दगडफेक, वाहने जाळली!

देवेंद्र फडणवीस यांनी आगमी निवडणुकीवर भाष्य केले आहे. पुढील लोकसभा निवडणुकीत तसेच २०२९ मध्ये होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभेत, भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी पक्ष एकत्र लढेल. आघाडीतील भागीदार बदलण्याची शक्यता आहे का असे विचारले असता, ते म्हणाले, सध्या ही शक्यता नाही. जेव्हा भागीदार बदलता आले असते किंवा राहू शकले असते, तेव्हा त्यांनी काहीतरी वेगळे विचार केला होता. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीचा विचार केला तर मी नेहमीच काहीही अशक्य नाही असे म्हणतो. पण, राज्य आता अशा टप्प्यावर पोहोचले आहे जिथे बदलाची गरज नाही.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा