33 C
Mumbai
Wednesday, March 11, 2026
घरविशेषफडणवीसांना गादीसाठी नाहीतर लोकांच्या सेवेसाठी पुन्हा यायचे होते!

फडणवीसांना गादीसाठी नाहीतर लोकांच्या सेवेसाठी पुन्हा यायचे होते!

अमृता फडणवीसांची यांचे वक्तव्य

Google News Follow

Related

भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज (५ डिसेंबर) मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर उपमुखमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्रीय मंत्री, विविध राज्याचे राज्याचे मुख्यमंत्री, सिनेसृष्टीतील अभिनेते या शपथ सोहळ्याला उपस्थित होते. मुंबईच्या आझाद मैदानावर हा सोहळा पार पडला. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीपूर्वी त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. देवेंद्र फडणवीस यांचा संघर्ष अमृता फडणवीस यांनी जवळून पाहीला आहे. त्यांना गादीसाठी पुन्हा यायचे नव्हते. तर लोकांच्या सेवेसाठी पुन्हा यायचे होते, असे अमृता फडणवीस यांनी म्हटले.

माध्यमांशी संवाद साधताना अमृता फडणवीस म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस हे सहाव्यांदा आमदार झाले तर आता तिसऱ्यांदा ते मुख्यमंत्री पदी विराजमान होत आहे. माझ्यासाठी ही खूप आनंदाची बाब आहे, तितकीच जबाबदारीची पण गोष्ट आहे. त्यांच्या मेहनतीला यश मिळाल्यामुळे मला खूप आनंद होत आहे. महायुती एकत्रित आहे.

त्या पुढे म्हणाल्या, महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी त्यांना आजपासून वाटचाल सुरू केलेली आहे.मी त्यांच्या संघर्ष जवळून पाहीला आहे. त्यांचे जीवनच एक संघर्ष आहे. पण त्यांच्यात जिद्द आहे. चिकाटी आहे. जेव्हा काही करायचे, तेव्हा ते करून दाखवतात. त्यांच्यात खूप संयम आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या मी पुन्हा येईन, यावरून विरोधकांनी टीका, टिप्पणी केली होती. यावर उत्तर देताना अमृता फडणवीस म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका, टिप्पणी झाली पण त्यांचे अर्जुनासारखे एकच लक्ष्य होते. त्यांना  गादीसाठी नाहीतर लोकांच्या सेवेसाठी पुन्हा यायचे होते, असे अमृता फडणवीस म्हणाल्या.

हे ही वाचा : 

“मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस, ईश्वरसाक्ष शपथ घेतो की…”

‘काम नीट न केल्यास बुलडोझरखाली टाकू’

बाबर, बांगलादेश आणि संभलमधील समाजकंटकांचा डीएनए एकच!

मालदामधील हॉटेलमध्ये बांगलादेशींना प्रवेश बंदी!

 

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
297,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा