31 C
Mumbai
Friday, December 5, 2025
घरविशेषIPL FactCheck : चेन्नईसाठी धोनी पनवती बनलाय, सोनू निगमचे ट्वीट व्हायरल

IPL FactCheck : चेन्नईसाठी धोनी पनवती बनलाय, सोनू निगमचे ट्वीट व्हायरल

चेन्नईच्या सामन्यांमध्ये उशिरा फलंदाजी केल्याबद्दल नेटिझन्स धोनीला ट्रोल करत आहेत. दरम्यान, सोनू निगमच्या नावाने एक ट्विट व्हायरल होत आहे. हे ट्विट का व्हायरल होत आहे? त्यात काय म्हटले आहे? येथे वाचा...

Google News Follow

Related

गुवाहाटीमध्ये राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामन्यामध्ये राजस्थानने चेन्नईवर वर्चस्व मिळवत पहिला विजय मिळवला.चेन्नईच्या पराभवानंतर सोशल मीडियावर महेंद्रसिंह धोनीला अनेकजण ट्रोल करायला लागले. त्याच दरम्यान सोनू निगमचे ट्वीट व्हायरल झाले.

चेन्नईच्या पराभवानंतर सोशल मीडियावर एक ट्वीट व्हायरल झाले. यात ‘धोनी हा चेन्नई सुपर किंग्ससाठी पनवती बनत चालला आहे, त्याला काढून टाका’ असे म्हटले होते. हे ट्वीट सोनू निगमने केल्याचे काहीजण म्हणत होते. गायक सोनू निगमने धोनीला उद्देशून हे ट्वीट केल्याचे समजले जात होते. पण हे ट्वीट फेक असून दुसऱ्याच सोनू निगमने केले असल्याचे स्पष्ट झाले आहे. ट्वीट करणारी ही व्यक्ती सोनू निगम सिंह असून ते वकील असल्याचे समोर आले आहे.

 


चेन्नई सुपर किंग्सचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी एमएस धोनीच्या खालच्या क्रमांकावर फलंदाजी करण्यामागचे कारण स्पष्ट केले. ते म्हणाले, “सामन्याच्या परिस्थितीवरुन धोनी कोणत्या कधी खेळायला जायचे हे ठरवतो. त्याचे शरीर, त्याचे गुडघे आता पूर्वीसारखे काम करत नाहीत. तो व्यवस्थितपणे हालचाल करु शकतो पण त्याचे गुडघे पूर्णपणे ठिक नाहीयेत.”

चेन्नई विरुद्ध बंगळुरु या सामन्यात गरज असताना महेंद्रसिंह धोनी फलंदाजीसाठी मैदानात उतरला नाही. तो नवव्या ओव्हरमध्ये खेळायला आला. त्याआधी रविचंद्रन अश्विन फलंदाजीला आला. यावरुन धोनीला सर्वजण ट्रोल करायला लागले. त्यामुळे काल धोनी वरच्या क्रमावर फलंदाजीसाठी आला. पण तरीही चेन्नईने सामना गमावला.

हे ही वाचा 

IPL 2025 : मुंबई इंडियन्सचा पहिला विजय, केकेआरवर ८ गडी राखून विजय

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा