25 C
Mumbai
Thursday, December 11, 2025
घरविशेष४१ व्या वयात धोनीने रचला विश्वविक्रम!

४१ व्या वयात धोनीने रचला विश्वविक्रम!

एडन मार्करांमचा २०८ वा झेल पकडून क्विंटन डी कॉकला मागे टाकले

Google News Follow

Related

आयपीएलच्या चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबादच्या सामन्यात महेंद्र सिंह धोनीने टी-२० क्रिकेटमधील मोठा विक्रम आपल्या नावावर नोंदवला आहे. वयाच्या ४१ व्या वर्षीही धोनी आपली जादू दाखवताना दिसतोय. पुरुषाच्या टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल टिपणारा विकेटकीपर म्हणून विक्रम आपल्या नावावर नोंदवला आहे. धोनीने टी-२० क्रिकेटमध्ये एडन मार्करांमचा २०८ वा झेल पकडून क्विंटन डी कॉकला मागे टाकले आहे. डी कॉकने आतापर्यंत २०७ झेल टिपलेले आहेत. त्या पाठोपाठ नंबर लागतो दिनेश कार्तिक. त्याने आतापर्यंत २०५ झेल टिपत तिसऱ्या स्थान गाठलेले आहे.

धोनीने सर्वाधिक झेल घेण्याचा टी-२० विक्रमावरच तो थांबलेला नाही. आयपीएलच्या इतिहासात २०० फलंदाजांना बाद करणारा तो पहिला विकेटकीपर ठरलेला आहे. धोनीने सनरायझर्सविरुद्ध स्टंपिंग आणि रनआउट करून हा करिष्मा केलेला आहे.

हेही वाचा :

प्लास्टिकचा वापर सोडाल, तरच पुढे टिकाल!

प्लास्टिकचा वापर सोडाल, तरच पुढे टिकाल!

सेक्स रॅकेट चालविणाऱ्या भोजपुरी अभिनेत्रीचा पर्दाफाश

चिनी सैनिकांच्या कृत्यांना भारतीय जवान देणार त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर

शुक्रवारी झालेल्या या सामन्यात चेन्नईने सनरायझर्स हैदराबादचा सहज ७ विकेट्सने पराभव केला. कर्णधार महेंद्र सिंह धोनीने टॉस जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय चेन्नईच्या गोलंदाजी अचूक ठरवत हैदराबादला अवघ्या १३४ धावांत रोखले. चेन्नईने हे सोपे आव्हान १९ व्या षटकात आऱामात पार केले. चेन्नईचा फिरकी जादूगर रवींद्र जडेजाने हैदराबादच्या फलंदाजांना सळो की पळो केले. त्यानंतर डेवोन कॉन्वेच्या तुफानी नाबाद ७७ धावांच्या जोरावर हैदराबादला चारी मुंड्या चीत केले. रवींद्र जडेजाला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. या हंगामात दोन वेळा सामनावीर पुरस्कार मिळवणारा रवींद्र जडेजा हा पहिला खेळाडू आहे.

चेन्नईने सुपर किंग्जने हैदराबादवरील या विजयामुळे गुणतक्त्यात आपले तिसरे स्थान कायम राखले आहे. आतापर्यंत झालेल्या सहा सामन्यात त्यांनी चार सामन्यात विजय मिळवत आठ गुण मिळवले आहे. पहिल्या लढतीत गुजरातने चेन्नईचा धुव्वा उडवला होता. मात्र त्यानंतर लखनौ आणि मुंबईचा पराभव करत चेन्नईने जोरदार वापसी केली. चौथ्या लढतीत राजस्थानकडून मात्र चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर काल हैदराबादला पराभूत करण्यात चेन्नईला यश आले.

धोनीचे हे पाच विक्रम मोडणे केवळ कठीण

  • एकदिवसीय सामन्याच्या इतिहासातील सर्वात कमी सामन्यांसाठी आयसीसी क्रमवारीत पहिले स्थान मिळवणारा धोनी पहिला फलंदाज आहे. पदार्पणानंतर अवघ्या ४२  डावांमध्ये त्याने हा विक्रम केलेला आहे.
  • एकदिवसीय सामन्यात विकेटकीपर फलंदाज म्हणून सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही धोनीच्या नावावर आहे. २००५ मध्ये लंकेविरुद्ध १८३ धावांची स्फोटक मॅचविनिंग खेळी करून त्याने हा विक्रम केला आहे. या खेळीत त्याने १५ चौकार आणि १० षटकारांची आतषबाजी केली.
  • भारतासाठी वनडे सामन्यात सर्वाधिक सामन्यांमध्ये कर्णधार होण्याचा विक्रम महेंद्रसिंग धोनीच्या नावावर आहे. धोनीने २००७  ते २०१८ दरम्यान २०० एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले.
  • धोनी आयसीसीच्या सर्व ट्रॉफी जिंकणारा जगातील एकमेव कर्णधार आहे. भारताने त्याच्या नेतृत्वाखाली २००७  टी-२० विश्वचषक, २०११ एकदिवसीय विश्वचषक आणि २०१३ चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. धोनीचा हा विक्रम मोडणे जवळजवळ अशक्य आहे.
National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा