28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
घरविशेषयष्टीमागे धोनीचे त्रिशतक

यष्टीमागे धोनीचे त्रिशतक

Google News Follow

Related

आयपीएल २०२४चे बिगुल वाजल्यानंतर महेंद्रसिंग धोनीने पहिल्या दोन सामन्यांमध्ये केवळ विकेटकीपिंगद्वारेच आपली छाप पाडली होती. पहिल्या दोन सामन्यात त्याला फलंदाजी मिळाली नव्हती. पण चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल २०२४ चा तिसरा सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळला आणि त्यात माहीची फलंदाजी चाहत्यांना पाहायला मिळाली. धोनीने आपल्या आक्रमक खेळीत धोनीने १६ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने नाबाद ३७ धावा ठोकून काढल्या. पण त्याआधी त्याने विकेटकीपिंग करताना प्रतिस्पर्धींच्या ३०० फलंदाजांना बाद करत त्रिशतक पूर्ण केले होते. हा आकडा गाठणारा तो जगातील पहिला यष्टीरक्षक ठरला आहे.

धोनीने टी-२० क्रिकेटमध्ये यष्टीमागे ३०० फलंदाजांना आपला शिकार बनवले आहे. टी-२० च्या ३६७ डावांमध्ये माहीने यष्टिरक्षक म्हणून ३०० फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आहे. ३०० धावांचा टप्पा पार करणारा धोनी जगातील पहिला यष्टीरक्षक ठरला. पाकिस्तानचा माजी यष्टीरक्षक कामरान अकमल या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने २८१ डावांमध्ये २७४ फलंदाजांना आपले बळी बनवले आहे.

टी-२० मध्ये यष्टिरक्षक म्हणून सर्वाधिक बळी
एमएस धोनी – ३०० (३६७ डावात)
कामरान अकमल – २७४ (२८१ डावात)
दिनेश कार्तिक – २७४ (३२५ डावात)
क्विंटन डी कॉक – २७० (२९० डावात)
जोस बटलर – २०९ (२५९ डावात)

धोनीने पृथ्वी शॉचा अफलातून झेल घेत हे त्रिशतक पूर्ण केले. दिल्ली कॅपिटल्सने अकराव्या षटकात पृथ्वी शॉच्या रूपाने डावातील दुसरी विकेट गमावली. पृथ्वी शॉला रवींद्र जडेजाने बाद केले. जडेजाच्या चेंडूवर धोनीने दिल्लीच्या सलामीवीराला झेलबाद केले होते.

हेही वाचा :

‘३०० रुपयांसाठी सभेला आलो’

ओवैसींना आला मुख्तार अन्सारीचा उमाळा

अडवाणींना भारतरत्न प्रदान करताना पंतप्रधान मोदी यांनी केले प्रोटोकॉलचे पालन

‘तेल्याचा मुलगा मंदिराचे उद्घाटन कसे करू शकतो?’

धोनीची आक्रमक फलंदाजी
दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात धोनी पहिल्यांदा फलंदाजीला मैदानात उतरला. त्याने पहिल्याच चेंडूवर चौकार लगावला. चेन्नईच्या माजी कर्णधाराने १६ चेंडूत ४ चौकार आणि ३ गगनचुंबी षटकारांच्या मदतीने नाबाद ३७ धावा केल्या. या काळात त्याचा स्ट्राइक रेट २३१.२५ होता. धोनी आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. चेन्नईला हा सामना जिंकता आला नसला तरी धोनीने आपल्या फलंदाजीने चाहत्यांची मने नक्कीच जिंकली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
167,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा