30.3 C
Mumbai
Monday, October 19, 2026
घरविशेष१५ दिवसात 'धुरंधर-२'ने कमावले १५०० कोटी!

१५ दिवसात ‘धुरंधर-२’ने कमावले १५०० कोटी!

पुष्पा 2 पेक्षा अजून मागे

Google News Follow

दिग्दर्शक आदित्य धर यांचा धुरंधर: द रिव्हेंज हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर १५ दिवस पूर्ण करूनही जोरदार कामगिरी करत आहे. चित्रपटाने दुसऱ्या आठवड्याच्या शेवटी भारतात ९३७.३२ कोटी रुपये (नेट) आणि जगभरात १४९२.१७ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

पहिला आठवडा अत्यंत यशस्वी ठरला, मात्र दुसऱ्या आठवड्यात कमाईत घट दिसून आली. तरीही उत्कृष्ट एकूण कामगिरीमुळे धुरंधर २ हा जागतिक स्तरावर सर्वाधिक कमाई करणारा चौथा भारतीय चित्रपट ठरला आहे.

हा चित्रपट त्याच्या पहिल्या भागापेक्षा (१३५४.८४ कोटी) खूप पुढे गेला असला तरी पुष्पा २: द रूल पासून अजूनही बऱ्यापैकी मागे आहे. अल्लू अर्जुन अभिनीत पुष्पा 2 ने सुमारे ६०–६५ दिवसांत १७४२.१० कोटींची कमाई केली होती. मात्र पहिल्या १५ दिवसांत धुरंधर २ ची कमाई पुष्पा २ पेक्षा जास्त आहे.

भारतामधील १५ दिवसांची कमाई:

पहिला आठवडा: ६७४.१७ कोटी
शुक्रवार: ४१.७५ कोटी
शनिवार: ६२.८५ कोटी
रविवार: ६८.१० कोटी
सोमवार: २५.३० कोटी
मंगळवार: २७.२५  कोटी
बुधवार: २०.१० कोटी
गुरुवार: १७.८० कोटी
एकूण: ९३७.३२ कोटी

हे ही वाचा:

होर्मुजमधून मार्ग देण्यासाठी आता इराणची ‘चीनच्या युआन’ची मागणी

इराणहून भारताकडे तेल घेऊन येणारे जहाज अचानक चीनकडे वळले

‘समोशांबद्दल’ बोलण्याऐवजी भाजपला संसदेत प्रश्न विचारा!

पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वामध्ये पोलीस ठाण्यावर आत्मघाती हल्ला

धुरंधर २ ला पुढील आठवड्यात कोणताही मोठा हिंदी चित्रपट स्पर्धेत नसल्यामुळे त्याच्या कमाईसाठी चांगली संधी आहे. दीर्घ कालावधीत हा चित्रपट पुष्पा २ ला मागे टाकू शकतो, पण बाहुबली २ (१८१०.६० कोटी) आणि दंगल (२०७० कोटी) यांचे विक्रम मोडणे हे खरे आव्हान असेल.

जागतिक स्तरावर सर्वाधिक कमाई करणारे भारतीय चित्रपट:

  • दंगल: २०७० कोटी
  • बाहुबली २: १८१०.६० कोटी
  • पुष्पा २: १७४२.१० कोटी
  • धुरंधर २: १४९२.१७  कोटी (सुरू)
  • धुरंधर: १३५४.८४ कोटी
  • आरआरआर: १२३० कोटी
  • केजीएफ २: १२१५ कोटी
  • जवान: ११६० कोटी
  • पठाण: 1,055 कोटी
  • कल्की २८९८ AD: १०४२.२५ कोटी

धुरंधर: द रिव्हेंज आता तिसऱ्या आठवड्यात प्रवेश करत आहे. प्रेक्षकांचा प्रतिसाद अजूनही चांगला असून हा चित्रपट लवकरच १००० कोटी नेट क्लबमध्ये प्रवेश करेल, अशी शक्यता आहे.

हा चित्रपट आदित्य धर यांनी दिग्दर्शित, लिखित आणि निर्मित केला आहे. यात रणवीर सिंग भारतीय गुप्तहेर हमजा अली मझारीच्या भूमिकेत आहेत. तसेच संजय दत्त, आर माधवन, अर्जुन रामपाल, राकेश बेदी, दानिश पंडोर आणि सारा अर्जुन यांच्याही भूमिका आहेत.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा