25 C
Mumbai
Thursday, January 8, 2026
घरविशेष'धुरंधर' भारताच्या पहिल्या पाच चित्रपटांच्या पंक्तीत

‘धुरंधर’ भारताच्या पहिल्या पाच चित्रपटांच्या पंक्तीत

शाहरुख, सलमान, रणबीरला टाकले मागे

Google News Follow

Related

रणवीर सिंगचा चित्रपट ‘धुरंधर’ने सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटांच्या यादीत मोठी झेप घेतली आहे. या चित्रपटाने ‘जवान’ आणि ‘केजीएफ: चॅप्टर २’ यांच्या एकूण  कमाईला मागे टाकत टॉप-५ यादीत स्थान मिळवले आहे.

विशेष म्हणजे, ‘धुरंधर’ अजूनही जागतिक स्तरावर दररोज सुमारे २० कोटी रुपयांची कमाई करत आहे. आठवड्याच्या दिवसांत कमाईचा वेग थोडा कमी होईल, तरीही हा चित्रपट यादीत आणखी वर जाण्याची क्षमता ठेवतो.

हे ही वाचा:

बीएसएफच्या जवानांसोबत वरुण धवनची धमाल

भारतावर आणखी कर लादणार! ट्रम्प यांनी का दिला इशारा?

सकाळची चांगली सुरुवात दिवस बदलू शकते

सोमनाथ मंदिर स्वाभिमानाचे प्रतिक… पंतप्रधान मोदींचा विशेष लेख

रविवारी ‘धुरंधर’ने देशांतर्गत १२.७५ कोटी रुपये तर आंतरराष्ट्रीय बाजारातून सुमारे ५ लाख डॉलर्सची कमाई केली. त्यामुळे ३१ दिवसांत चित्रपटाची जागतिक कमाई १,२०७ कोटी रुपये इतकी झाली आहे.

ही कमाई २०२२ मधील ब्लॉकबस्टर ‘केजीएफ: चॅप्टर २’ (१,२०० कोटी रुपये)पेक्षा अधिक आहे. मागील आठवड्यात ‘धुरंधर’ने ‘जवान’, ‘कल्की २८९८ एडी’ आणि ‘पठाण’ या चित्रपटांनाही मागे टाकले आहे.

याचा अर्थ असा की रणवीर सिंगने आता:

शाहरुख खान – जवान

सलमान खान – बजरंगी भाईजान

यश – केजीएफ २

रणबीर कपूर – अ‍ॅनिमल

या सर्वांच्या सर्वात मोठ्या हिट चित्रपटांच्या कमाईलाही मागे टाकले आहे.

धुरंधर’च्या पुढे आता फक्त चार चित्रपट

सध्या ‘धुरंधर’च्या पुढे फक्त चारच चित्रपट आहेत:

दंगल – आमिर खान

बाहुबली 2: द कन्क्लूजन – एस. एस. राजामौली

आरआरआर – एस. एस. राजामौली

पुष्पा 2 – अल्लू अर्जुन

सर्वाधिक कमाई करणारे टॉप-5 भारतीय चित्रपट

क्रमांक चित्रपट जागतिक कमाई
1 दंगल २०७० कोटी
2 बाहुबली २ १७८८कोटी
3 पुष्पा २ १७४२ कोटी
4 RRR १२३० कोटी
5 धुरंधर १२०७ कोटी

‘दंगल’, ‘बाहुबली २’ आणि ‘पुष्पा २’ हे चित्रपट ‘धुरंधर’च्या आवाक्याबाहेर असले, तरीही RRR (१२३० कोटी)ला मागे टाकून ‘धुरंधर’ लवकरच चौथ्या क्रमांकावर पोहोचेल, अशी शक्यता आहे. सध्याच्या वेगाने पाहता, तो बुधवारपर्यंत RRRचा विक्रम मोडू शकतो

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
286,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा