28.7 C
Mumbai
Sunday, October 18, 2026
घरविशेष'धुरंधर : द रिव्हेन्ज'वर चाहत्यांच्या उड्या... १ लाखांची तिकिटे बुक

‘धुरंधर : द रिव्हेन्ज’वर चाहत्यांच्या उड्या… १ लाखांची तिकिटे बुक

Google News Follow

दिग्दर्शक आदित्य धर यांच्या बहुप्रतिक्षित धुरंधर: द रिव्हेंज (धुरंधर २) या चित्रपटाने रिलीजपूर्वीच बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात केली आहे. पेड प्रीव्यूची अॅडव्हान्स बुकिंग सुरू होताच प्रेक्षकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, चित्रपटाच्या पेड प्रीव्यू शोसाठी १.२ लाखांहून अधिक तिकिटे विकली गेली असून सुमारे १३ कोटी रुपयांपेक्षा जास्त ग्रॉस कमाई झाली आहे.

ट्रेड ट्रॅकिंग वेबसाइटनुसार देशभरातील प्रीव्यू शोसाठी सुमारे १.२ लाख तिकिटांची विक्री झाली आहे. यामुळे सुमारे ७.७४ कोटी रुपयांची ग्रॉस कमाई झाली असून यात ब्लॉक बुकिंगचा समावेश नाही. ब्लॉक बुकिंग धरल्यास एकूण ग्रॉस कलेक्शन सुमारे १३.५५ कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचे सांगितले जात आहे. चित्रपटाचे पेड प्रीव्यू १८ मार्चला होणार असून अधिकृत थिएटर रिलीज १९ मार्च २०२६ रोजी होणार आहे.

पहिल्या २४ तासांत जोरदार प्रतिसाद

बुकिंग सुरू झाल्यानंतर पहिल्या २४ तासांतच तिकिट विक्री वेगाने वाढली. या काळात १.२ लाखांपेक्षा जास्त तिकिटे विकली गेली. यामध्ये हिंदी 2D आवृत्तीचा सर्वाधिक वाटा असून सुमारे १.११ लाख तिकिटांमधून जवळपास ७.६५ कोटी रुपयांची कमाई झाली. देशभरातील ६४०० पेक्षा जास्त शोमध्ये ही बुकिंग नोंदवली गेली. तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषांतील आवृत्त्यांसाठीही बुकिंग सुरू झाल्याने चित्रपटाच्या पॅन-इंडिया रिलीजची तयारी स्पष्ट दिसत आहे.

दोन तासांत ४ कोटींची तिकिट विक्री

अॅडव्हान्स बुकिंग सुरू होताच प्रेक्षकांचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून आला. पहिल्या दोन तासांतच सुमारे ३५ हजार तिकिटांची विक्री झाली, ज्यांची किंमत जवळपास ४ कोटी रुपये होती. ही तिकिटे प्रामुख्याने PVR INOX आणि Cinépolis सारख्या मल्टिप्लेक्स चेनमध्ये विकली गेली.

हे ही वाचा:

भारताकडे २५० दशलक्ष बॅरल तेलसाठा

खामेनींच्या काळात इराणी महिलांचे स्वातंत्र्य अबाधित राहिले का?

पाकिस्तानात पेट्रोल आता ३२१ रुपये लिटर

युद्धाचा तणाव वाढला तरी दुबईची प्रॉपर्टी मार्केट मजबूत

ऑनलाइन तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्म बूक माय शो वरही चित्रपटाची बुकिंग वेगाने झाली, जिथे तासाला सुमारे 7,500 तिकिटे बुक होत असल्याचे दिसून आले. काही मल्टिप्लेक्समध्ये प्रीमियम प्रीव्यू शोसाठी तिकिटांची किंमत 2,500 रुपयांपर्यंत असल्याचे, विशेषतः दिल्ली-एनसीआरमध्ये, सांगितले जात आहे.

दमदार स्टारकास्ट

पहिल्या भागात रणवीर सिंग यांच्यासोबत आर माधवन, अर्जुन रामपाल, अक्षय खन्ना, संजय दत्त यांनी दमदार भूमिका साकारल्या होत्या. दमदार कथा, उत्कृष्ट दिग्दर्शन आणि प्रभावी अभिनयामुळे धुरंधर हा चित्रपट मोठ्या हिटमध्ये गणला गेला होता.

धुरंधर: द रिव्हेंज हा २०२५ मधील हिट चित्रपट धुरंधरचा सिक्वेल असून त्याची कथा गुप्तहेरगिरी आणि ऍक्शन-थ्रिलरवर आधारित आहे.

सणांच्या काळात रिलीज

१९ मार्चला रिलीज होणारा हा चित्रपट गुढी पाडवा, उगाडी, ईद यांच्या आसपास थिएटरमध्ये येणार असल्याने ओपनिंग कलेक्शन वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ट्रेड विश्लेषक आणि निर्माता गिरीश जोहार यांच्या मते, सध्याच्या ऍडव्हान्स बुकिंग आणि पेड प्रीव्यूचा ट्रेंड पाहता चित्रपटाच्या ओपनिंग वीकेंडचे कलेक्शन ३०० कोटी रुपयांपेक्षा जास्त होऊ शकते. आता ही दमदार ऍडव्हान्स बुकिंग बॉक्स ऑफिसवर विक्रमी ओपनिंगमध्ये रूपांतरित होते का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा