35 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
घरविशेषमाहितीपटातून उलगडणार शूमाकरचे आयुष्य

माहितीपटातून उलगडणार शूमाकरचे आयुष्य

Google News Follow

Related

मायकेल शुमाकर यांचा २०१३ मध्ये फ्रांसमध्ये स्कीईंग दरम्यान अपघात झाला होता आणि ते गंभीर जखमी झाले होते. मायकेल शुमाकर यांच्या पत्नी कोरिना यांनी सांगितले की, ‘शूमाकर वेगळा आहे; पण इथे आहे.’ शुमाकर हे मेंदूला झालेल्या दुखापतीपासून अजूनही सावरत असल्याचे त्यांनी सांगितले. शुमाकर यांचे कुटुंब अपघात झाल्यापासून फारसे कोणाच्या संपर्कात नव्हते. १५ सप्टेंबरला शुमाकर यांच्यावर नेटफ्लिक्सवर माहितीपट प्रदर्शित होणार आहे. गोपनीयता खूप महत्त्वाचे असल्याचे कोरिना यांनी सांगितले. शुमाकर हे खूप खंबीर आहेत आणि ते रोज याची जाण करून देत असतात, असेही त्या म्हणाल्या.

हे ही वाचा:

ममतांचा पुन्हा पराभव करायला भाजपाकडून ‘या’ महिलेला उमेदवारी

तालिबानच्या कब्जानंतर राशिद खानचा राजीनामा

चमच्याने बोगदा खणून कैदेतून सुटका

इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत वाढवली

आम्ही एकत्र राहतो आहोत आणि त्याच्यावर योग्य उपचार सुरू आहेत. मायकेलला बरे वाटण्यासाठी आम्ही शक्य ते सर्व प्रयत्न करत आहोत. मायकेल त्याच्या कुटुंबासोबत आहे हे भासवून देत आहोत. काहीही होऊ दे, पण मी शक्य तेवढे सर्व करीन. आम्ही सर्वजण करू. मायकेल यांना जसे आवडते तसे करण्याचा प्रयत्न असतो, असे कोरिना म्हणाल्या. गोपनीयता महत्त्वाची आहे, असे मायकेलचे म्हणणे होते. त्यामुळे त्याचे वैयक्तिक आयुष्य त्याला त्याच्या पद्धतीने जगायला मिळावे हे महत्त्वाचे आहे. मायकेलने आमची नेहमीच काळजी घेतली आणि आता आम्ही त्याची काळजी घेत आहोत.

फॉर्म्युला वन करिअरमध्ये शूमाकर यांनी ९१ रेसेस जिंकल्या आहेत. शुमाकर यांनी १९९४ आणि १९९५ मध्ये फॉर्म्युला वन जिंकून २००० ते २००४ मध्ये सलग ही स्पर्धा जिंकली होती. २००६ मध्ये निवृत्ती घेतल्यानंतर पुन्हा रेस ट्रॅकवर त्यांनी कमबॅक केले होते. परंतु कमबॅक केल्यानंतर त्याला फारसे यश न आल्यामुळे त्याने २०१२ मध्ये पुन्हा फॉर्म्युला वनला अलविदा केले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा