मतचोरीच्या आरोपावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांना निवडणूक आयोगाने पुरावे देण्यास अथवा माफी मागण्यास सांगितले आहे. यावरून सध्या सत्ताधारी आणि विरोधकांकडून टीका-टिप्पणी होत आहे. दरम्यान, राहुल गांधींच्या माफिनाम्यावर समाजवादी पक्षाच्या खासदार डिंपल यादव यांनी प्रतिक्रिया दिली आणि म्हटले, ‘माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही.’
एएनआयशी संवाद साधताना त्या म्हणाल्या, “माफीनाम्याचा कुठलाही प्रश्नच येत नाही. कारण जर विरोधी पक्षनेत्यांना असं वाटतं की मतं चोरली जात आहेत, तर निवडणूक आयोगाने स्वतः पुढे येऊन यासाठी पुरावे सादर करायला हवेत की असं काही होत नाहीये.
अखिलेश यादव यांनी देखील १८,००० मतदारांची शपथपत्रं सादर केली आहेत, ज्यांची नावे वगळण्यात आली किंवा जे निवडणूक आयोगाच्या त्रुटींमुळे मतदान करू शकले नाहीत. त्यामुळे इतकी शपथपत्रं सादर झाल्यानंतर, निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन खोटं बोलणं हेच संशय निर्माण करतं.”
हे ही वाचा :
तरुणांना आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी देण्यासाठी रोजगार मिशन
पाकिस्तानात मुसळधार पावसाचा कहर
वेतन असमानतेच्या बाबतीत पाकिस्तानची स्थिती सर्वांत वाईट
बेंगळुरू, मुंबई, दिल्ली जगातील टॉप रेसिडेन्शियल मार्केटमध्ये
दरम्यान, निवडणूक आयोगाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या “मत चोरी” आरोपाबद्दल त्यांना फटकारले आणि राजकीय पक्ष निवडणूक आयोगावर दोषारोप करताना मतदारांना टार्गेट करत असल्याचा आरोप केला. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राहुल गांधी यांना सात दिवसांच्या आत पुराव्यांसह प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले आहे. नाहीतर निवडणूक आयोगावरील आरोपांसाठी जाहीर माफी मागण्यास सांगितले आहे.
#WATCH | Delhi: On CEC Gyanesh Kumar's statement on Lok Sabha LoP Rahul Gandhi, Samajwadi Party MP Dimple Yadav, says, "I don't think there is any question of apologising because if the LoP feels that votes are being stolen, then the Election Commission should come forward with… pic.twitter.com/W7zPUAedxW
— ANI (@ANI) August 18, 2025







