30 C
Mumbai
Saturday, December 6, 2025
घरविशेषडोपिंग प्रकरणी थाळीफेकपटू कमलप्रीत कौरवर इतक्या वर्षांची बंदी

डोपिंग प्रकरणी थाळीफेकपटू कमलप्रीत कौरवर इतक्या वर्षांची बंदी

२९ मार्च २०२२ पासून लागू होणारी बंदी मार्च २०२५ मध्ये संपेल

Google News Follow

Related

देशातील प्रसिद्ध थाळीफेकपटू कमलप्रीत कौरवर बंदी घालण्यात आली आहे. ऍथलेटिक्स इंटिग्रिटी युनिटने (एआययू ) तिच्यावर डोपिंगप्रकरणी कारवाई केली आहे.

ही बंदी २९ मार्च २०२२ पासून लागू होईल आणि मार्च २०२५ मध्ये संपणार आहे. एकूण ही बंदी तीन वर्षांची असेल. एआययूने कमलप्रीतची पतियाळा येथे यावर्षी ७ मार्च रोजी केलेल्या तपासणीमध्ये ती स्टेरॉईड पॉझिटिव्ह आढळली. त्यांनतर मे महिन्यात तिच्यावर तात्पुरती निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. पण आता तिच्यावर तीन वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कमलप्रीतच्या नमुन्यात स्टॅनोझोलॉल आढळून आले. हे एक सामान्य ऍनाबॉलिक स्टेरॉईड आहे आणि जागतिक ऍथलेटिक्सनुसार ते प्रतिबंधित पदार्थांच्या यादीमध्ये समाविष्ट आहे. ऍथलेटिक्सनुसार, बंदी घातलेल्या पदार्थांच्या यादीत त्याचा समावेश आहे.भारताच्या कमलप्रीत कौरवर बंदी घातलेल्या पदार्थाच्या वापरासाठी २९ मार्च २०२२ पासून तीन वर्षांसाठी बंदी घातली आहे. ७ मार्च २०२२ नंतर त्यांनी भाग घेतलेल्या सर्व स्पर्धांमध्ये तिचे सर्व निकाल रद्दबातल ठरतील असे संस्थेनं निवेदनात म्हटलं आहे.

कमालप्रीतने टोकियो गेम्समध्ये चमकदार कामगिरी करत सहावे स्थान पटकावले होते. त्याने गेल्या वर्षी टोकियो गेम्सपूर्वी थाळी फेकमध्ये मध्ये ६५.०६ मीटरचा राष्ट्रीय विक्रम केला होता. पात्रता फेरीत दुसऱ्या स्थानावर राहिल्यानंतर टोकियो गेम्समध्ये तिने अंतिम फेरी गाठली होती जिथे तिने ६३.७० मीटरच्या सर्वोत्तम प्रयत्नासह सातवे स्थान पटकावले होते. मैदानी स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूची ही तिसरी सर्वोत्तम कामगिरी ठरली होती.

हे ही वाचा:

‘ते’ एसटी कर्मचारी सेवेत येणार असल्याचा जल्लोष

मुंबई, दिल्लीत दहशतवादविरोधी बैठक

हिजाब बंदीवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींमध्ये मतभेद, आता मोठ्या खंडपीठात होणार सुनावणी

ठाकरे गटाच्या मशालीवर ‘या’ पक्षाने केला दावा

कमलप्रीत ही पंजाबमधील श्री मुक्तसर साहिब जिल्ह्यातील मलौत गावातील काबरवालाची रहिवासी आहे. प्रशिक्षकाच्या सांगण्यावरून, कमलप्रीतने २०१२ मध्ये ऍथलेटिक्सचे प्रशिक्षण घेतले आणि पहिल्या राज्यस्तरीय स्पर्धेत चौथे स्थान पटकावले. कमलप्रीतने २०१४ मध्ये या खेळाला गांभीर्याने घेण्यास सुरुवात केली आणि तिच्या गावातील भारतीय क्रीडा प्राधिकरण केंद्रात तिचे प्रारंभिक प्रशिक्षण सुरू केले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा