26 C
Mumbai
Monday, February 26, 2024
घरविशेषडीएमडीके प्रमुख आणि अभिनेते विजयकांत यांचे कोरोनाने निधन!

डीएमडीके प्रमुख आणि अभिनेते विजयकांत यांचे कोरोनाने निधन!

७१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Google News Follow

Related

अभिनेता आणि डीएमडीके प्रमुख विजयकांत (७१) यांचे गुरुवारी चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात निधन झाले.कोरोनामुळे त्यांचे निधन झाल्याचं समोर आलं आहे.ते ७१ वर्षांचे होते. कोविड चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.

लोकप्रिय तमिळ अभिनेते व तामिळनाडू विधानसभेतील माजी विरोधी पक्षनेते कॅप्टन विजयकांत यांचे ७१ व्या वर्षी निधन झाले आहे.डीएमडीके पक्षाचे ते प्रमुख होते.वियकांत यांनी २००५ मध्ये देसिया द्रविड कडगम (DMDK) या पक्षाची स्थापना केली होती.विजयकांत यांना नियमित आरोग्य तपासणीसाठी मंगळवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी, पक्षाने सांगितले की, विजयकांत “निरोगी” आहेत आणि चाचण्यांनंतर घरी परततील.रुग्णालयात त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आणि त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.अखेर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.विजयकांत यांचा मृत्यू कोरोनाने झाल्याचे बोलले जात आहे.

मात्र,हॉस्पिटलच्या निवेदनात त्यांना न्यूमोनिया झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.हॉस्पिटलने दिलेल्या निवेदनात असे लिहिले आहे की, “कॅप्टन विजयकांत यांना न्यूमोनियासाठी दाखल केल्यानंतर व्हेंटिलेटरी सपोर्टवर होते. वैद्यकीय कर्मचार्‍यांच्या सर्वोत्तम प्रयत्नांनंतरही २८ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी त्यांचे निधन झाले.”तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी डीएमडीकेच्या नेत्यावर पूर्ण शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.

हे ही वाचा:

धुक्याच्या विळख्यामुळे उत्तर भारतात शाळांना सुट्टी

युपीत नायब तहसीलदार मशिदीत पढत होता नमाज

येरुणकर हत्येसाठी शस्त्र पुरवणाऱ्या ज्वेलर्ससह दोन जण अटकेत

वर्ल्ड कप फायनलमध्ये जमा झालेल्या प्लास्टिक कचऱ्यातून बेंच, जॅकेट

विजयकांत यांच्या मृत्यूवर पंतप्रधान नरेंद्र मोदी शोक व्यक्त केला आणि ट्विट करत म्हणाले की, थिरू विजयकांत जी यांच्या निधनाने अत्यंत दु:ख झाले आहे. तमिळ चित्रपट जगतातील एक दिग्गज, त्यांच्या करिष्माई अभिनयाने लाखो लोकांची मने जिंकली.एक राजकीय नेता म्हणून, ते लोकसेवेसाठी मनापासून वचनबद्ध होते.त्याच्या जाण्याने एक पोकळी निर्माण झाली आहे जी भरून काढणे कठीण आहे. ते एक जवळचे मित्र होते आणि मी त्यांच्यासोबत अनेक वर्षांमध्ये केलेल्या संवादाची आठवण करतो. या दुःखाच्या प्रसंगी माझे विचार त्यांच्या कुटुंबासह, चाहते आणि असंख्य अनुयायांसह आहेत. ओम शांती.

दरम्यान, तामिळनाडूच्या राजकारणातील एक महत्वाचा चेहरा म्हणून विजयकांत यांची ओळख होती. ते डीएमडीके पक्षाचे संस्थापक सदस्य आणि विद्यमान अध्यक्ष होते. २०११ ते २०१६ दरम्यान विरोधी पक्षनेते पदावर त्यांनी काम केलं आहे. तसेच टॉलिवूडमधील ते एक लोकप्रिय अभिनेते आहेत. १५४ सिनेमांत त्यांनी काम केलं आहे.

 

 

 

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
131,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा