26 C
Mumbai
Monday, February 16, 2026
घरविशेष'नेपाळ मॉडेल भारतात लागू करायचंय का? तिथे तर राजघराणं पाडलं'

‘नेपाळ मॉडेल भारतात लागू करायचंय का? तिथे तर राजघराणं पाडलं’

राहुल गांधींवर भाजपा खासदार कंगना रणौतचा घणाघात

Google News Follow

Related

कॉंग्रेस नेते आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या ‘एक्स’वरील जनरल झेड पोस्टवर भाजपा महिला खासदार कंगना रणौत यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. कंगना म्हणाल्या, “राहुल गांधी नेहमी असे विधान करतात ज्यामुळे देशाची लाज जाते. आता ते जनरल झीला (Gen Z) आंदोलनासाठी हाक देत आहेत. म्हणजेच त्यांना भारतात ‘नेपाळ मॉडेल’ लागू करायचं आहे का?”

“पण राहुल गांधींनी हे लक्षात घ्यायला हवं की, नेपाळमध्ये जेन झीनेच एका राजवंशीय सरकारला उलथवून टाकलं. नेपाळमध्ये लोकशाही प्रस्थापित झाली, आणि अशा प्रकारे घराणेशाही संपवण्यात आली. राहुल गांधींना जगात काय घडतंय याची माहितीच नाही,” असा टोला त्यांनी राहुल गांधीना लगावला.

कंगना पुढे म्हणाल्या,”ते सकाळी उठतात आणि डोळे चोळत सोशल मीडियावर काहीही पोस्ट करतात. जर त्यांनी असंच सुरू ठेवलं, तर त्यांना देश सोडून पळावं लागेल.”

हे ही वाचा: 

दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी निवडणुकीत अभाविपचा अध्यक्ष, डाव्या संघटनांचा सुपडा साफ

सॅम पित्रोदा म्हणतात- पाकिस्तान-बांगलादेशमध्ये नेहमी घरच्यासारखं वाटलं!

मुरीदके कॅम्प उद्ध्वस्त: ऑपरेशन सिंदूरवर जैशनंतर लष्कर-ए-तोयबाच्या कमांडरचीही कबुली!

पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्रीपदी महिला; पण महिलांच्या नरकयातनांत वाढ

तसेच, त्यांनी राहुल गांधींवर गंभीर आरोप करत म्हटलं, “ते याआधीही देशात अस्थिरता निर्माण करण्याचा कट रचत होते. अमेरिकेत जाऊन देशासाठी भीक मागत होते. त्यांची ही वागणूक देशातील नागरिकांना दुखावणारी आणि संतप्त करणारी आहे.” दरम्यान, राहुल गांधींच्या या पोस्टनंतर सत्ताधारी नेत्यांकडून त्यांच्यावर आणि पक्षावर सडकून टीका केली जात आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
292,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा