27.9 C
Mumbai
Saturday, October 17, 2026
घरक्राईमनामाअमरावतीत १८० महिलांचे लैंगिक शोषण, क्लिप्स काढणारा मोहम्मद अयाझ अटकेत

अमरावतीत १८० महिलांचे लैंगिक शोषण, क्लिप्स काढणारा मोहम्मद अयाझ अटकेत

आरोपी एमआयएम या पक्षाचा सदस्य असल्याची माहिती

Google News Follow

महाराष्ट्रात अशोक खरात प्रकरण सध्या चर्चेत असताना, महिलांच्या छळाची आणखी एक घटना समोर आली असून खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी खासदार अनिल बोंडे यांनी अमरावतीच्या परतवाडा परिसरातील एका महिलेच्या लैंगिक छळाची घटना उघड केली. आरोपी मोहम्मद अयाझ मोहम्मद तन्वीर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने आतापर्यंत १८० महिलांचे लैंगिक शोषण केल्याची माहिती समोर येते आहे. मात्र, पीडित महिला आतापर्यंत समोर आली नव्हती. या प्रकरणाच्या सखोल तपासात एक धक्कादायक बाब समोर आली की आरोपी तनवीर हा एमआयएम (MIM) चा पदाधिकारी आहे.

न्यायालयाने आरोपीला २१ तारखेपर्यंत सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याने आपल्या मोबाईलमध्ये अनेक मुलींचे अश्लील व्हिडिओ बनवून ते व्हायरल केले होते. तपासात असेही समोर आले की, आरोपीने मोबाईलमधील बरीच माहिती डिलीट केली असून ती सायबर तज्ज्ञांच्या मदतीने पुन्हा मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. चौकशीदरम्यान आरोपीने कबूल केले की हे संपूर्ण कृत्य गेल्या एका वर्षापासून सुरू होते. त्याने दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुली केवळ परतवाड्यातील नसून अमरावती, नागपूर आणि आसपासच्या गावांतील आहेत. आतापर्यंत आरोपीने सात पीडित मुलींची नावे सांगितली आहेत. मात्र, अद्याप त्यांच्या नातेवाईकांकडून कोणतीही तक्रार पुढे आलेली नाही. त्यामुळे पोलिसांनी त्यांना पुढे येण्याचे आवाहन केले असून त्यांची ओळख गोपनीय ठेवली जाईल आणि सुरक्षा दिली जाईल, असे आश्वासन दिले आहे.

हे ही वाचा:

अमेरिका-इराण तणावामुळे तेलबाजार ढवळला; किमतींमध्ये ६% पर्यंत घसरण

भारताकडून अफगाणिस्तानला १३ टन बीसीजी लसींची मदत

महाराष्ट्रात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता

हंगेरीमधील रोमा समाजासाठी डॉ. आंबेडकरांचे विचार ठरले परिवर्तनाचे प्रतीक

या प्रकरणातील मोठा ट्विस्ट म्हणजे आरोपी हा सामान्य व्यक्ती नसून एमआयएम पक्षाचा पदाधिकारी असल्याचे समोर आले आहे. या उघडकीमुळे प्रकरणाला वेगळे वळण मिळाले असून परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपी आयाज हा एमआयएम शहराध्यक्ष हाजी इरफान खान यांच्याकडून नियुक्तीपत्र स्वीकारताना दिसणारे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. तसेच आयाज हा असदुद्दीन ओवैसी यांच्या कार्यक्रमात सक्रिय होता, अशी माहितीही समोर आली आहे. मागील महापालिका निवडणुकीदरम्यान बडनेरा येथील ओवैसी यांच्या सभेत तो मंचावर उपस्थित होता आणि त्याने रील्सही शूट केल्या होत्या. त्यामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून आता सर्वांचे लक्ष पोलीस तपासाकडे लागले आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
338,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा