29 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
घरविशेषआता शिक्षकांनी कपडे कोणते घालावेत हे शाळा ठरवणार!

आता शिक्षकांनी कपडे कोणते घालावेत हे शाळा ठरवणार!

राज्यातील शाळांमध्ये शिक्षकांसाठी ड्रेस कोड लागू होणार

Google News Follow

Related

राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने शिक्षकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांप्रमाणे आता शिक्षकांनाही ड्रेस कोड लागू होणार आहे. त्यामुळे आता शिक्षकांनाही शाळेने ठरवून देण्यात आलेले कपडे परिधान करून यावे लागणार आहे. राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी याबाबत महत्वाची घोषणा केली आहे. एकाच रंगाचा ड्रेसकोड सर्व शिक्षकांनी वापरावा, शाळेत शिक्षकांनी जीन्स, टी-शर्ट वापरू नये, अशा सूचना सरकारकडून शाळांना देण्यात आल्या आहेत.

राज्यभरातील शाळांमध्ये ड्रेसकोड लागू झाल्यानंतर शिक्षकांना त्यांच्या मनाप्रमाणे कोणतेही कपडे परिधान करता येणार नाहीत. शाळेतील सर्व शिक्षकांना व्यवस्थापनाने निश्चित केलेले कपडे परिधान करावे लागतील. शिक्षकांच्या कपड्याचा रंग कुठला असावा याबाबत शाळेने निर्णय घ्यावा असं शासनाने सांगितलं आहे. या नियमाप्रमाणे महिला शिक्षकांसाठी साडी अथवा सलवार-चुडीदार, कुर्ता, दुपट्टा असा पेहराव असावा. तर, पुरूष शिक्षकांना शर्ट-ट्राउझर पँट घालावी लागेल. शर्ट इन असावा तसेच गडद रंगाचे आणि चित्रविचित्र नक्षीकाम किंवा चित्रे असलेले पेहराव घालू नयेत. तसेच शिक्षकांनी जीन्स टी-शर्टचा वापर शाळेमध्ये करू नये या मार्गदर्शक सूचनाही देण्यात आल्या आहेत. तसेच शिक्षकांनी कुठले बूट घालावेत, कशा चपला घालाव्यात, महिला शिक्षकांच्या चपला कशा असाव्यात याबाबत नियमावली ठरवण्यात आली आहे.

हे ही वाचा:

‘काळा पैसा परत येण्याची भीती’

“पाकव्याप्त काश्मीर भारताचाच भाग; तेथील हिंदूही आमचे आणि मुसलमानही”

आता तुम्हीच आमचे रक्षण करा!

लोकसभा निवडणुकीच्या तारखा उद्या होणार जाहीर!

एकीकडे सरकारने शिक्षकांसाठी ड्रेसकोड लागू केला असेल तरी दुसऱ्या बाजुला त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. शिक्षकांना समाजात प्रतिष्ठेचे स्थान असल्याने शिक्षकांच्या नावाच्या आधी इंग्रजीत टीआर (Tr) आणि मराठीत टि असे संबोधन लावण्याची परवानगी देण्यात आली आहे. शिक्षकांच्या वाहनावर देखील हे संबोधन आणि त्याअनुरूप बोधचिन्ह देखील लावण्याची परवानगी देण्यात आल्याचे दीपक केसरकर यांनी सांगितले. सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे शिक्षकी पेशा आता स्टेटस सिम्बॉल होणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
167,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा