29.2 C
Mumbai
Tuesday, October 20, 2026
घरविशेषबिहारच्या माजी मंत्र्यासह अनेकांवर ईडीचे छापे

बिहारच्या माजी मंत्र्यासह अनेकांवर ईडीचे छापे

चार राज्यात कारवाई

Google News Follow

राज्य सहकारी बँकेत ८५ कोटी रुपयांच्या कथित फसवणुकीच्या मनी लाँड्रिंग तपासाचा एक भाग म्हणून अंमलबजावणी संचालनालयाने शुक्रवारी राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) आमदाराशी संबंधित १८ परिसरांची झडती घेतली. बिहार, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि दिल्लीतील १८ परिसरांची झडती ईडीच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी सुरू केली आहे.

या परिसरात आरजेडीचे आमदार आणि बिहारचे माजी मंत्री आलोक कुमार मेहता (५८), जे बिहारस्थित वैशाली शहरी विकास सहकारी बँकेचे प्रवर्तक आहेत. तसेच बँकेच्या इतर अधिकारी आणि ग्राहकांच्या काही मालमत्तांचा समावेश आहे. सूत्रांनी सांगितले. मेहता हे बिहारच्या उजियारपूर मतदारसंघाचे आमदार आहेत आणि लालू प्रसाद यादव यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय जनता दलाचे ज्येष्ठ नेते आहेत.

हेही वाचा..

हिंदू आध्यात्मिक मेळाव्यात दुसऱ्या दिवशी ‘युग नायक विवेकानंद’, आचार्य वंदन असे कार्यक्रम

माविआकडून जागावाटपात चुका झाल्यात; त्या स्वीकारल्या पाहिजेत

“राजकारणात महत्त्वाकांक्षा घेऊन नव्हे तर ध्येय घेऊन या!”

मविआचा जागावाटप घोळ दोन दिवसांत संपला असता तर नक्की फायदा झाला असता

त्यांनी यापूर्वी राज्याचे महसूल आणि जमीन सुधारणा मंत्री म्हणून काम पाहिले आहे. सुमारे ८५ कोटी रुपयांच्या निधीच्या कथित गैरव्यवहारप्रकरणी बँक आणि तिच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या काही राज्य पोलिसांच्या एफआयआरवरून ईडीचा तपास सुरू आहे. आरोपांनुसार, बँकेत तब्बल ४०० बनावट खाती उघडण्यात आली आणि फसव्या एलआयसी पावत्या आणि गोदामांच्या आधारे निधी त्यांच्याकडे वळवला गेला. ईडीने टाकलेल्या छाप्यांवर आरजेडीने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा