विशाखापट्टणममध्ये भाविकांच्या अंगावर भिंत कोसळून आठ जणांचा मृत्यू

राज्य, केंद्र सरकारडून मदत जाहीर

विशाखापट्टणममध्ये भाविकांच्या अंगावर भिंत कोसळून आठ जणांचा मृत्यू

आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथील श्री वराह लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिरात भाविकांच्या अंगावर भिंत कोसळून दुर्घटना घडली आहे. चंदनोत्सवानिमित्ताने देवाचे दर्शन घेण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांच्या अंगावर रात्री अडीच वाजता भिंत कोसळली. यात आठ भाविकांचा दुर्दैवाने मृत्यू झाला. तर, अनेक भाविक जखमी झाले आहेत.

विशाखापट्टणम येथील श्री वराह लक्ष्मी नरसिंह मंदिरामध्ये दरवर्षी चंदनोत्सव साजरा केला जातो. त्यामुळे भगवान नरसिंहाचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक या ठिकाणी येतात. मंदिराबाहेर भाविकांची लांब रांग लागलेली होती. मंदिर परिसरात असलेल्या एका दुकानाची नव्यानेच बांधलेली भिंत भाविकांची रांग असलेल्या बाजूला कोसळली. यात आठ भाविकांचा मृत्यू झाला. माहितीनुसार, ही घटना घडण्याच्या काही वेळापूर्वी मुसळधार पाऊस झाला होता. जिल्हाधिकारी हरेंद्र प्रसाद यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळाल्यानंतर एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या तुकड्या बोलवण्यात आल्या आणि वेगाने मदत कार्य सुरु करण्यात आले.

दुर्घटनेबद्दल कळल्यानंतर आंध्र प्रदेशचे गृहमंत्री वंगलापुडी अनिता यांनी घटनास्थळी धाव घेतली. मुसळधार पावसामुळे आणि भाविकांचा भार पडल्यामुळे ही घटना घडली असावी, अशी माहिती त्यांनी दिली आहे. भाविक हे ३०० रुपयांच्या विशेष दर्शन पाससह रांगेत उभे होते. या घटनेनंतर मुख्यमंत्री नायडू यांनी मृतांच्या कुटुंबियांना शोक व्यक्त केला आणि मृतांच्या कुटुंबीयांना २५ लाख रुपयांची भरपाई जाहीर केली. तसेच, घटनेत जखमी झालेल्यांना ३ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली.

हे ही वाचा:

नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक रघुजीराजे भोसलेंची तलवार येणार महाराष्ट्रात

टार्गेट्स निवडा !! पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय सैन्याला दिले स्वातंत्र्य

पहलगाममधला सर्वोत्कृष्ट अभिनय!

मग पाकिस्तानचा श्वासही बंद केला जाईल

आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे भिंत कोसळून झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले. एक्सवरील एका पोस्टमध्ये, पंतप्रधान मोदींनी मृतांच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त केला आणि जखमींच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली. त्यांनी प्रत्येक मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी (पीएमएनएरएफ) कडून २ लाख रुपये आणि जखमींना ५०,००० रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली.

Exit mobile version