झारखंडमधील पूर्वी सिंहभूम जिल्ह्यातील कोवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चांपी गावात अज्ञात हल्लेखोरांनी घरात घुसून ६५ वर्षीय निराशी सरदार यांची धारदार शस्त्राने हत्या केली. याचवेळी तिची मुलगी गुलाबी सरदार आणि नात संध्या सरदार यांच्यावरही हल्ला करून त्यांना गंभीर जखमी करण्यात आले. ही घटना रविवारच्या मध्यरात्री घडली, जेव्हा घरात सर्वजण झोपेत होते. त्या वेळी घरात कोणताही पुरुष सदस्य उपस्थित नव्हता. सोमवारी सकाळी संध्या सरदार यांचे वडील राजीन सरदार घरी पोहोचले असता दरवाजा आतून बंद होता. त्यांनी खिडकीतून घरात प्रवेश केला, तर तीन्ही महिला रक्ताच्या थारोळ्यात सापडल्या.
घराच्या भिंती व जमिनीवर रक्ताचे डाग दिसून आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तिन्हींना रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे डॉक्टरांनी निराशी सरदार यांना मृत घोषित केले. इतर दोघींवर सध्या उपचार सुरू आहेत. पोलिस या घटनेचा तपास करत असून, परिवाराने जमीनविवादामुळे ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला आहे.
हेही वाचा..
राज ठाकरेंविरुद्ध डीजीपींकडे तक्रार, प्रकरण काय?
मोदी, आरएसएस यांच्यावरील अभद्र व्यंगचित्र हटविण्याचे न्यायालयाचे आदेश
रॉबर्ट वाड्रा यांची ईडी कार्यालयात चौकशी
२०१७ साली व्हिसा संपला, फळं-फुलं खाल्ली, दोन मुलींसह रशियन महिला ‘गुहेत’ सापडली!
दुसऱ्या घटनेत, जिल्ह्याच्या एमजीएम पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात सोमवारी एका अज्ञात युवतीचा अर्धनग्न मृतदेह नाल्यातून सापडला आहे. युवतीचे दोन्ही पाय दोरीने बांधलेले होते आणि तिच्या अंगावर फक्त अर्धवट कपडे होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह बाहेर काढला. एमजीएम ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन दास यांनी सांगितले की, प्राथमिक तपासणीत ही हत्या करून मृतदेह नाल्यात फेकल्याचा प्रकार वाटत आहे. सध्या युवतीची ओळख पटलेली नाही. पोलिसांनी आजूबाजूच्या पोलीस ठाण्यांमध्ये गायब झालेल्यांची चौकशी सुरू केली असून, मृतदेह उत्तरविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.







