26 C
Mumbai
Monday, December 15, 2025
घरविशेषठाण्यात अभियंत्यांना निलंबित करून प्रकरण 'बुजवले'

ठाण्यात अभियंत्यांना निलंबित करून प्रकरण ‘बुजवले’

Google News Follow

Related

मुंबई ठाण्यातील खड्डे हा एक चर्चेचा विषय आहे. परंतु ठाण्यातील खड्डे आता राजकीय डोकेदुखी ठरू लागल्याने चार अभियंत्यांना तडकाफडकी निलंबितही करण्यात आलेले आहे. गेल्या काही दिवसांपासून ठाण्यातील खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. या खड्ड्यांचा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनाही बसला होता. याचीच दखल पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली होती. ठाण्यातील खड्डयांची पाहणी करून शिंदेनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले होते.त्यानंतर आज या खड्ड्यांना जबाबदार असलेल्या पालिकेच्या चार अभियंतांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले.

परंतु महापालिकेने केलेली ही कारवाई मात्र जाचक असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. अभियंत्यावर कारवाई झाली आता कंत्राटदारांवर कधी असे आता सर्वसामान्य म्हणून लागलेला आहे. खड्डे घोटाळा यामध्ये अनेक कंत्राटदार हे सहभागी असल्यामुळे सर्वचजण आता त्यांच्यावर कधी कारवाई होणार असाच प्रश्न विचारत आहे.

उथळसर प्रभाग समितीतील अभियंता चेतन पटेल, वर्तकनगर प्रभाग समितीतील अभियंता प्रशांत खडतरे, लोकमान्य नगर-वर्तक नगर प्रभाग समितीतील अभियंता संदीप सावंत आणि संदीप गायकवाड यांना निलंबित करण्यात आले आहे. रस्त्यावरील खड्डे कालमर्यादेत बुजविण्यात या अभियंत्यांना अपयश आल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, पालिकेने अभियंत्यांवर कारवाई केली. मात्र, कंत्राटदारांवर कारवाई कधी करणार असा सवाल या निमित्ताने केली जात आहे.

हे ही वाचा:

मुंबईचे माजी उपमहापौर डॉ. राम बारोट यांचे निधन

अंबरनाथमध्ये बांधा-खोदा-बांधा-पुन्हा खोदा धोरणावर कोट्यवधी खर्च

६५ तासांमध्ये मोदींनी उरकल्या २० बैठका!

‘त्या’ अत्याचाराच्या व्हिडीओ क्लिप पोलिसांच्या हाती!

ठाण्यामध्ये रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली आहे. तीन हात नाका सिग्नलसह शहरातील विविध रस्त्यांची दुर्दशा झालेली आहे. शिंदे यांनी महापालिकेचे अधिकारी, एमएमआरडीए, एमएसआरडीसी, पीडब्ल्यूडी, वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांसह रस्त्यांची पाहणी केली. शहरातील पाच उड्डाणपुलावरील रस्ते नीट आहेत. मात्र, काही रस्त्यांची डागडुजी होणे बाकी आहे. त्यामुळेच एक मात्र नक्की आता ठाणे महापालिका प्रशासनाने रस्ते आणि त्यावरील खड्डे हा मुद्दा आता मनावर घेतलेला आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा