29 C
Mumbai
Thursday, January 22, 2026
घरविशेषकणकवली मालवणचे माजी आमदार डॉ.य.बा.दळवी कालवश !

कणकवली मालवणचे माजी आमदार डॉ.य.बा.दळवी कालवश !

आमचे डॉक्टर म्हणून होते परिचित

Google News Follow

Related

ज्येष्ठ समाजवादी नेते आणि कणकवली-मालवणचे माजी आमदार डॉ. यशवंतराव बाबाजी दळवी तथा य. बा. यांचे आज मुंबई मुक्कामी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांनी फेब्रुवारी महिन्यात शंभराव्या वर्षात पदार्पण केले होते. ‘आमचे डॉक्टर’ या नावाने कणकवली तालुक्यामध्ये सुपरीचीत असणारे डॉ.य. बा दळवी १९६२साली कणकवली व तद्‌नंतर मालवण (१९७८) या मतदारसंघातून प्रजा समाजवादी पक्ष आणि जनता दलाच्या तिकिटावरून विधानसभेवर निवडून आले होते. ज्येष्ठ समाजवादी नेते, कोकणचे सुपुत्र बॅरिस्टर नाथ पै आणि केंद्रीय माजी अर्थमंत्री आणि रेल्वे मंत्री प्रा. मधु दंडवते यांचे ते विश्वासू सहकारी होते.

हे ही वाचा:

उर्फी जावेदला चेहऱ्यावर झाली जखम

महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार

वाईट हवामानामुळे वैष्णो देवी यात्रेचे नोंदणी थांबवली

‘सात दिवसात पुरावे द्या, नाहीतर देशाची माफी मागा’

१९५३ साली वैद्यकीय परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी मुंबईत न राहता थेट आपले गाव कळसुली गाठले. त्यानंतर कोरोनाच्या साथीमध्ये आजारी पडेपर्यंत अविरत रुग्णसेवा त्यांनी केली. ती तेथील लोकांची गरज आणि परिस्थिती जाणून घेत. अडलेली बाळंतीण आणि सर्पदंशाने बाधित रुग्णावर उपचार करण्यासाठी
रात्री अपरात्री बॅग उचलून ४, ५ मैल ते जात असत. गावासाठी हायस्कूल आणि ओसरगाव- कळसुली तसेच कणकवली- हळवल- शिरवल मार्गे रस्ते श्रमदान आणि भूदान या मार्गाने त्यांनी विकसित केले.

त्यांच्या पश्चात पत्नी डॉ. श्रीमती साधना, सुपुत्र रणजीत (क्रीडा पत्रकार) तसेच कन्या कल्पना कदम, दीया मोरे, सुप्रिया सुलचंदानी तसेच नातवंडे-पतवंडे आहेत. नातू अनिरुद्ध हा सध्या वैद्यकीय क्षेत्रातील पदव्युत्तर शिक्षण घेत आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा