शनी शिंगणापूर देवस्थानातून १६७ कर्मचाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे, ज्यामध्ये ११४ मुस्लिम कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. भाजपा आध्यात्मिक आघाडी प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी यापूर्वी देवस्थानात मोठ्या संख्येने मुस्लिम कर्मचारी कार्यरत असल्याचा दावा करत याविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. त्यांच्या या इशाऱ्यानंतर देवस्थान समितीने ही कारवाई केल्याचे बोलले जात आहे. या घटनेमुळे महाराष्ट्राच्या धार्मिक आणि सामाजिक वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
याबाबत माहिती देताना आचार्य तुषार भोसले म्हणाले, शनी शिंगणापूर देवस्थानात मुस्लीम कर्मचारी नियुक्त केल्यामुळे सकल हिंदू समाजाच्या वतीने उद्या (१४ जून) भव्य मोर्चाचे आयोजन केले होते. पण या मोर्च्याचा दबाव इतका वाढला कि या मंदिर विश्वस्तांना झुकावे लागले. आणि आज त्यांनी जाहीर केले कि मुस्लीम कर्मचाऱ्यांना आम्ही काढून टाकतोय. हिंदू समाजाच्या एकजूटीचा हा विजय आहे. राज्यातील इतर देवस्थानांना आग्रह करतो कि अशा पद्धतीने हिंदू देवस्थानांमध्ये अन्य धर्मियांचे लाड खपवून घेतले जाणार नाहीत.
ते पुढे म्हणाले, देवस्थानामध्ये एकूण २४६४ कर्मचारी नियुक्त आहेत. त्यापैकी ११४ कर्मचारी मुस्लीम आहेत. मंदिर प्रशासनाने कारवाई करत मुस्लीम कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे.
हे ही वाचा :
…असा वाचला विश्वासकुमार रमेश, एक थरारक कथा!
बेलपत्रांमध्ये दडलेत अजब-गजब गुणधर्म! नव्या संशोधनातून मोठा खुलासा
मुंबईतील पोलिस निरीक्षकांच्या त्या बदल्यांवर ‘मॅट’चे प्रश्नचिन्ह
मेहदी हसन मिराजला बांगलादेश वनडे संघाचं कर्णधारपद
या कारवाईवर मंदिर समितीची प्रतिक्रिया आली. मंदिर समितीला कामावर घेण्याचा आणि काढण्याचा अधिकार आहे. त्यानुसार सतत गैरहजर असणे, देवस्थानच्या नियमांचे पालन न केल्याने आणि इतर चुकांमुळे आज १६७ कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. मागील पाच वर्षांपूर्वी १०५ कर्मचाऱ्यांवर अशी कारवाई करत काढून टाकले होते, असे मंदिर समितीने म्हटले.







