महादेवी हत्तीणीला आणण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मध्यस्थी करणार असल्याचे समोर आले आहे. राज्य सरकार नांदणी मठासोबत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. महादेवी हत्तीणीची निगा राखण्यासाठी डॉक्टरांचे पथक तयार करण्यात येणार आहे आणि महादेवी हत्तीणी परत आली पाहिजे हीच सर्वांची इच्छा असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
३४ वर्षांपासून माधुरी हत्तीण नांदणी मठात असून, हत्तीण परत आली पाहिजे, ही आपल्या सर्वांची इच्छा आहे. मठाने एक याचिका दाखल करावी आणि सोबतच राज्य सरकार सुद्धा एक याचिका दाखल करेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. हत्तीणीची निगा राखण्यासाठी डॉक्टरसह राज्य सरकार एक टीम तयार करेल, आणि तसे सुप्रीम कोर्टात सांगेल. तिची निगा राखण्यासाठी राज्य सरकार आवश्यक ती सर्व मदत करेल. रेस्क्यू सेंटर, आहार याबाबतीत सुद्धा राज्य सरकार आपल्या याचिकेत सुप्रीम कोर्टाला आश्र्वस्त्त करेल.
हे ही वाचा :
ख्रिस्ती धर्माचा प्रचार करणारे कमल हासन म्हणतात, सनातन धर्माच्या साखळ्या तोडा!
एमसीडी अधिकाऱ्याला ५० हजारांची लाच घेताना पकडले
भारतीय युद्धनौकांनी फिलिपिन्सच्या नौदलासोबत केला सराव
गंभीर व दुर्मीळ कर्करोगाचं उपचार आता गोरखपूरमध्ये!
महादेवी हत्तीणीला परत कसे आणता येईल?, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि लोकप्रतिनिधी व संबंधितांची आज बैठक पार पडली. अजित पवार, चंद्रकांत पाटील, गणेश नाईक, हसन मुश्रीफ, गिरीश महाजन, प्रकाश आबिटकर या बैठकीत उपस्थित होते.
तसेच नांदणी मठाच्या प्रतिनिधींसोबत प्रकाश आवाडे, राजू शेट्टी, सतेज पाटील, सदाभाऊ खोत, धैर्यशील माने आणि इतरही लोकप्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकार पूर्ण ताकदीने नांदणी मठासोबत असल्याचे सांगितले.







