22 C
Mumbai
Tuesday, January 20, 2026
घरविशेषखड्ड्यातल्या थंड पाण्यामुळे बुडालेल्या इंजिनियरला वाचवण्यात अपयश

खड्ड्यातल्या थंड पाण्यामुळे बुडालेल्या इंजिनियरला वाचवण्यात अपयश

ग्रेटर नोएडामध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअरचा कार पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून मृत्यू

Google News Follow

Related

उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडाच्या सेक्टर १५० मध्ये २७ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर युवराज मेहता याची कार पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडल्याने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यानंतर पीडित युवराज मेहता याच्या कुटुंबाने आपत्कालीन मदत पथकांवर टीका केली आहे. थंड पाण्यामुळे आणि संभाव्य धोक्यांमुळे मदत पथकांनी योग्य कारवाई करण्यास उशीर केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

युवराजच्या कुटुंबीयांनी केलेल्या आरोपांमुळे आणि घटनेमुळे स्थानिक प्रशासनाच्या आपत्कालीन परिस्थितीला प्रतिसाद देण्याच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत, कारण घटनास्थळी तीन विभाग आणि अंदाजे ८० कर्मचारी उपस्थित होते परंतु ते अभियंत्याला वाचवू शकले नाहीत. युवराजचे वडील राजकुमार मेहता यांच्या म्हणण्यानुसार, शनिवारी पहाटे ते अपघातस्थळी पोहोचले तेव्हा दृश्यमानता कमी होती आणि वारंवार फोन करूनही त्यांना त्यांच्या मुलाचे वाहन शोधण्यात अडचण येत होती.

“जेव्हा मी त्याला फोन केला तेव्हा त्याने गाडीच्या आत त्याच्या फोनचा टॉर्च चालू केला, ज्यामुळे आम्हाला थोडासा प्रकाश दिसला पण कोणालाही पाण्याच्या आत जाणे खूप कठीण होते. पोलिस आणि इतर बचाव अधिकाऱ्यांनी दोरी टाकण्याचा प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही,” असे युवराजच्या वडिलांनी सांगितले. पोलिस, अग्निशमन विभाग आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) उपस्थित असूनही, त्वरित बचावकार्य झाले नाही. “पोलिसांना पाचारण करण्यात आले आणि जवळच्या काही लोकांनीही मदत करण्याचा प्रयत्न केला, पण माझ्या मुलाला वाचवण्यासाठी काहीही करता आले नाही,” असे राजकुमार मेहता म्हणाले. त्यांनी पुढे आरोप केला की, बचावकर्त्यांनी पाण्यात जाण्यास नकार दिला, कारण त्यांनी पाण्यात अतिशय थंड तापमान आणि लपलेल्या लोखंडी सळ्यांचा धोका असल्याचे सांगितले. राजकुमार मेहता यांनी असा दावाही केला की, जर तज्ज्ञ आत जाऊ शकले असते तर कदाचित त्यांचा मुलगा वाचला असता.

प्रत्यक्षदर्शी मोनिंदर यांनी म्हटले की, युवराज याने जवळजवळ दोन तास मदतीसाठी याचना केली. डिलिव्हरी एजंट मोनिंदर यांनी सांगितले की, बचाव कर्मचाऱ्यांना मदत करण्यात अडचण येत असल्याचे पाहून त्याने स्वतः खड्ड्यात उडी मारली. “हा अपघात रात्री १२ वाजण्याच्या सुमारास घडला. तेव्हा दाट धुके होते. गाडी खड्ड्यात पडल्यानंतर, तो माणूस जवळजवळ दोन तास मदतीसाठी आवाज देत होता. पोलिस, एसडीआरएफ आणि अग्निशमन दल सर्व उपस्थित होते, पण कोणीही त्याला मदत केली नाही. सगळे म्हणत राहिले, पाणी थंड आहे, आम्ही आत जाणार नाही किंवा आत लोखंडी सळ्या आहेत, आम्ही आत जाणार नाही. या मुलाच्या मृत्यूला सरकारी विभाग जबाबदार आहेत,” असे त्यांनी सांगितले.

हे ही वाचा:

सुरक्षित गुंतवणुकीत चांदी चमकली! दर तीन लाखांच्या पार

स्पेनमध्ये हायस्पीड ट्रेनची रुळावरून घसरून दुसऱ्या ट्रेनला धडक; २१ जणांचा मृत्यू

ट्रम्प यांच्या गाझा शांती मंडळात सामील होण्यासाठी भारताला आमंत्रण

झारखंडमधील भीषण अपघातात ५ ठार, २५ जखमी

नोएडाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त राजीव नारायण मिश्रा यांनी पुष्टी केली की कुटुंबाच्या तक्रारीच्या आधारे एफआयआर नोंदवण्यात आला आहे. “आम्ही शक्य तितके प्रयत्न केले आणि त्याचा जीव वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. एसडीआरएफ देखील घटनास्थळी होते, परंतु दृश्यमानता जवळजवळ शून्य होती. कुटुंबाच्या तक्रारीच्या आधारे, एफआयआर नोंदवण्यात आला आहे आणि दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई केली जाईल,” असे त्यांनी सांगितले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
287,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा