चार वर्षांनंतर द फॅमिली मॅनचा तिसरा सीझन प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित झाला आहे. मनोज बाजपेयी, जयदीप अहलावत, शारिब हाशमी आणि इतर कलाकारांच्या अभिनयाने सजलेली राज-डीके निर्मित ही स्पाय थ्रिलर मालिका प्रचंड लोकप्रिय आहे. हा सीझन ईशान्य भारतात घडत असून, कथेत नवीन खलनायक आणि एक वैयक्तिक मिशन आहे. त्यामुळे अनेक अनपेक्षित वळणे आणि रहस्ये उलगडणारा हा सीझन प्रेक्षकांची अपेक्षा पूर्ण करतो.
विजय सेतुपतीचा धमाकेदार कॅमिओ
राज आणि डीके यांच्या मालिकांचे कट्टर चाहते ‘द फॅमिली मॅन’ आणि ‘फर्जी’ यांच्यातील क्रॉसओव्हरची अपेक्षा करत होते. अशीच जोडणी आता अधिक मजबूत झाली आहे.
‘फर्जी’ मध्ये विजय सेतुपती मायकेल वेदनायगम ही भूमिका करतो प्रमुख आणि स्पेशल टास्क फोर्स अधिकारी आहे. त्याच पात्राने द फॅमिली मॅन 3 मधील एका एपिसोडमध्ये प्रवेश केला आहे.
अशा आहेत भूमिका
एका एपिसोडमध्ये श्रीकांत (मनोज) आणि जे.के. (शारिब) हे म्यानमारमध्ये प्रवेश करण्यासाठी सीमारेषा ओलांडण्याच्या प्रयत्नात असतात, जेणेकरून ते रुकमा (जयदीप) याचा शोध घेऊ शकतील. त्यांच्यासाठी बेकायदेशीर मार्गाने सीमा ओलांडण्यासाठी मायकेल (विजय सेतुपती) ला मदतीसाठी बोलावले जाते.
हे ही वाचा:
कर्नाटकात डीके शिवकुमार बनणार मुख्यमंत्री? सत्तासंघर्षाचा प्रश्न पोहचला दिल्लीमध्ये
माओवाद्यांचे आणखी एक षड्यंत्र फेल!
ईडीकडून रॉबर्ट वाड्रा यांच्याविरुद्ध चार्जशीट
दिल्ली ब्लास्ट : जावेद सिद्दीकीवर दोन कोटींच्या ठगीचा आरोप
‘फर्जी’च्या पहिल्या सीझनमध्ये मायकेलने श्रीकांतला मदतीसाठी फोन केला होता. तसेच ‘द फॅमिली मॅन २’ मधील चेल्लम सरांनी मायकेलशी संपर्क साधला होता.
“द फॅमिली मॅन 3 कधीही वेगवान होत नाही. पण पुढच्या भागात काय होणार याबद्दल उत्सुकता वाढवतो. पहिल्या अर्धात कथा एकतर्फी वाटते, पण नंतरचा भाग थरारक पाठलाग, भयावह शांतता आणि अनपेक्षित वळणांनी भरलेला आहे.
कलाकार
या सीझनमध्ये निमरत कौर, प्रियमणी, अश्लेशा ठाकूर, वेदांत सिन्हा, श्रेया धनवंतरि, गुल पनाग, सीमा बिस्वास, विपिन शर्मा, दिलीप ताहिल, दर्शन कुमार, हार्मन सिंग्हा, पालिन कबाक, आदित्य श्रीवास्तव आणि जुगल हंसराज हे कलाकार झळकतात.







