इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेला युद्धविराम आता संपुष्टात आला आहे. इस्रायली लष्कराने ट्विटरवर पोस्ट करत म्हणाले की, हमासने युद्धविरामाचे उल्लंघन करून इस्रायली हद्दीतगोळीबार केला आहे.यांनतर आयडीएफने गाझामध्ये हमासच्या विरोधात आपले ग्राउंड ऑपरेशन पुन्हा सुरू केले आहे. आयडीएफने सांगितले की, आज किबुत्झ हॉलिटमध्ये एक अलर्ट जरी करण्यात आला, आणि तेथील लोकांचे पुनरावलोकन केले जात आहे.
इस्रायल आणि हमास यांच्यातील सात दिवसांचा युद्धविराम करार २४ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत चालला होता.या सात दिवसांच्या युद्धविरामात दोन्ही बाजूंनी लोकांना (बंधक आणि कैदी) सोडण्यात आले होते.युद्धबंदी लागू करण्यात कतार आणि अमेरिकेने महत्त्वाची भूमिका बजावली.
हे ही वाचा:
विजेचे बिल होते चार हजार रुपये; जमा झाले १९७ कोटी!
हवामान बदल शिखर परिषदेसाठी मोदी दुबईत!
‘बोगद्यातून सुटका झालेले सर्व कामगार तंदुरुस्त’
राजस्थान, मध्य प्रदेशात भाजप; तेलंगणात बीआरएसपेक्षा काँग्रेस सरस
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी मंगळवारी सांगितले की, त्यांचा देश सर्व ओलीसांना परत आणण्यासाठी वचनबद्ध आहे, हमासचे नामोनिशाण मिटवून टाकू आणि गाझा यापुढे इस्रायली नागरिकांना धोका देणार नाही, असे वचन नेतन्याहू यांनी दिले.
दरम्यान, दहशतवादी हमास गटाने ७ ऑक्टोबर २०२३ रोजी दक्षिण इस्रायलमध्ये रॉकेट हल्ले सुरू केले, ज्यामध्ये १,२०० हुन अधिक लोक मारले गेले तर २४० लोकांना ओलीस घेतले.त्यांनतर इस्रायलने प्रत्युत्तर देत गाझा जमिनीवर आक्रमण करत बॉम्बफेक केली, ज्यामध्ये १५,००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला.