31 C
Mumbai
Saturday, December 13, 2025
घरविशेषपहलगाम हल्ल्यातील मृतांच्या नातेवाईकांना ५० लाख, जगदाळेंच्या मुलीला सरकारी नोकरी

पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या नातेवाईकांना ५० लाख, जगदाळेंच्या मुलीला सरकारी नोकरी

फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

Google News Follow

Related

जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पर्यटकांना लक्ष्य करण्यात आले. दहशतवाद्यांनी केलेल्या या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला तर २० जण जखमी झाले. मृतांमध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे. तर जखमी पर्यटकांपैकी चार जण महाराष्ट्रातील रहिवासी आहेत. देशभरातून या घटनेचा शोक व्यक्त केला जात असताना या पीडितांच्या कुटुबींयांना आणि जखमींना मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

पहलगाम हल्ल्यामध्ये ठार झालेल्या राज्यातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५० लाख रुपयांचे अर्थसहाय्य करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच मृतांच्या कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी देण्याचा निर्णयही राज्य सरकारने घेतला आहे. सर्वप्रथम मंत्रिमंडळ बैठकीत पहलगाम हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

यापूर्वी आसावरी जगदाळेंना पुण्यातील डी वाय पाटील संस्थेमध्ये नोकरी देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता त्यांना सरकारी नोकरी देण्याचा निर्णय झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा विशेषाधिकार वापरून मृतांच्या कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी देण्याता निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील अतुल मोने (डोंबिवली), संजय लेले (डोंबिवली), हेमंत जोशी (डोंबिवली), संतोष जगदाळे (पुणे), कौस्तुभ गणबोटे (पुणे), दिलीप देसले (पनवेल) या सहा जणांनी या हल्ल्यात आपला प्राण गमावला.

हे ही वाचा..

भारतामध्ये सोन्याची मागणी ८०० टनांहून अधिक

पाकिस्तानी हॅकर्सकडून राजस्थानमध्ये सायबर हल्ला

पहलगाम हल्ल्यावर संसदेत चर्चा गरजेची

अयोध्या : राम जन्मभूमी मंदिराच्या मुख्य शिखरावर ४२ फूट उंच ध्वजदंड स्थापित

२२ एप्रिल (मंगळवार) रोजी दुपारी, पहलगामच्या बैसरन व्हॅलीत फिरायला गेलेल्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यांना हिंदू कोण आणि मुस्लीम कोण असं विचारत हिंदूंना ठार करण्यात आलं. अजान, कलमा म्हणायला म्हणायला सांगितले असा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला. या हल्ल्यात एकूण २६ जणांचा मृत्यू झाला, त्यापैकी २५ भारतीय तर एक नेपाळी नागरिक होता. मृतांमध्ये देशाच्या विविध भागातील पर्यटकांचा समावेश होता.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा