राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यावर महाराष्ट्रातील गडचिरोली पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी एक आक्षेपार्ह व्यंगचित्र पोस्ट केल्याचा आरोप आहे. दरम्यान, आरजेडी नेत्यावर एफआयआर दाखल होताच पक्षातील नेत्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे आणि केंद्र सरकारवर टीका केली जात आहे.
तेजस्वी यादव यांनी एक्सवर एक व्यंगचित्र शेअर केलं होतं. या व्यंगचित्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एका “जुमलेबाज दुकानात” (खोटी आश्वासने) उभं असलेली विडंबनात्मक प्रतिमा दाखवली होती, जी बिहारमधील गया येथील रॅलीशी संबंधित होती. या पोस्टवर भाजप समर्थकांनी आक्षेप घेतला असून, ती पंतप्रधानांचा अपमान करणारी आणि समाजात तेढ निर्माण करणारी असल्याचा दावा करण्यात आला आहे.
या प्रकरणी भाजपचे आमदार मिलिंद नरोटे यांनी गडचिरोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी तेजस्वी यादव यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला. या प्रकरणी भारतीय न्याय संहिताच्या कलम १९६ (वेगवेगळ्या गटांमध्ये शत्रुत्व वाढवणे), ३५६ (बदनामी), ३५२ (शांतता भंग करण्याच्या उद्देशाने जाणूनबुजून अपमान) आणि ३५३ (सार्वजनिक गैरप्रकार घडवून आणणारी विधाने) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे, एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
दरम्यान, तेजस्वी यादव यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या एफआयआरवर, राजद नेते संजय यादव म्हणतात, “त्यांनी (तेजस्वी यादव) कोणत्या प्रकारचे शब्द वापरले? प्रत्येक नागरिकाच्या बँक खात्यात १५ लाख रुपये देण्याचे आश्वासन कोणी दिले? दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन कोणी दिले? बिहारला विशेष पॅकेज आणि विशेष दर्जा देण्याचे आश्वासन कोणी दिले? बिहारचा विकास करण्याचे आश्वासन कोणी दिले?… जर त्यांना बिहारला दिलेल्या त्यांच्या आश्वासनांची आठवण करून देत असाल तर तुम्ही देशातील प्रत्येक जिल्ह्यात एफआयआर दाखल करावा… फक्त एका आमदाराने एफआयआर का दाखल करावा?…”
हे ही वाचा :
अहमदाबादमध्ये ‘गाझा पीडित’च्या नावाखाली फसवणूक; सीरियन नागरिक अटकेत!
गुवाहाटीमध्ये ४१ फूट उंच गणेश मूर्ती ठरणार विशेष आकर्षण!
कोल्हापूरमध्ये दोन गटांमध्ये हाणामारी, १० जण जखमी, वाहने जाळली!
विद्यार्थिनीवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला, चेहऱ्यावर पडले १७ टाके!
राजद प्रवक्ते शक्ती सिंह यादव म्हणाले, “निवडणूक आयोगाने द्वेषपूर्ण भाषणासाठी पंतप्रधान मोदींविरुद्ध काही कारवाई केली का किंवा एफआयआर दाखल केला का?. तथापि, विरोधी पक्षातील लोकांसोबत हे वारंवार घडते. पण याची कोणाला भीती वाटते? जेव्हा सरकार सामान्य लोकांच्या रागाची भीती बाळगते, तेव्हा ते न्यायालय आणि पोलिसांकडून पाठिंबा मागते. पण आम्हाला याची भीती वाटणार नाही. आम्ही त्यांना समोरासमोर आव्हान देऊ.”
आज गया में लगेगी झूठ और जुमलों की दुकान!
प्रधानमंत्री जी, गया में बिना हड्डी की जुबान से आज झूठ और जुमलों का हिमालय खड़ा करेंगे लेकिन बिहार के न्यायप्रिय जनता दशरथ मांझी की तरह उनके झूठ और जुमलों के इन विशाल पहाड़ों को तोड़ देगी।
11 साल अपनी और 20 वर्षों की एनडीए सरकार के 20… pic.twitter.com/X1KRhb80pY
— Tejashwi Yadav (@yadavtejashwi) August 22, 2025







