28.1 C
Mumbai
Saturday, October 17, 2026
घरविशेषगुवाहाटीमध्ये ४१ फूट उंच गणेश मूर्ती ठरणार विशेष आकर्षण!

गुवाहाटीमध्ये ४१ फूट उंच गणेश मूर्ती ठरणार विशेष आकर्षण!

ईशान्य भारतातील सर्वात उंच गणेशमूर्ती

Google News Follow

गुवाहाटी शहरात गणेश चतुर्थीच्या स्वागतासाठी जोरदार तयारी सुरू आहे. फाटासील आमबारी भागात उभारण्यात आलेली ४१ फूट उंच गणेशमूर्ती यंदाच्या उत्सवात प्रमुख आकर्षण ठरणार आहे. आयोजकांच्या मते, ही मूर्ती ईशान्य भारतातील सर्वात उंच गणेशमूर्ती आहे. या भव्य मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी आसपासच्या जिल्ह्यांसह आसाम, मेघालय आणि अरुणाचल प्रदेशातूनही भाविक गुवाहाटीकडे येण्याची शक्यता आहे. मूर्तीची उंची, रंगसंगती आणि शिल्पकला भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. गणेशमूर्तीला राजस्थानी राजेशाही पोशाख, शुभ-लाभ चे शिलालेख, आणि सुमारे २० हजार दिव्यांच्या सजावटीने सजवले गेले आहे.

उत्सवानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जसे की भजन-संध्या, बालगोपाळांसाठी स्पर्धा, स्थानिक कलाकारांचे नृत्य आणि संगीत सादरीकरण, तसेच मोफत आरोग्य तपासणी शिबिर सुद्धा आयोजित केले गेले आहे. गणेशोत्सवासाठी पोलीस प्रशासनाने कडक बंदोबस्त ठेवला आहे. CCTV कॅमेरे, ड्रोनच्या साहाय्याने देखरेख, वाहतूक नियंत्रणासाठी स्वतंत्र मार्गरेषा, तसेच आपत्कालीन वैद्यकीय सेवा देखील उपलब्ध ठेवण्यात आली आहे.

हे ही वाचा : 

कोल्हापूरमध्ये दोन गटांमध्ये हाणामारी, १० जण जखमी, वाहने जाळली!

विद्यार्थिनीवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला, चेहऱ्यावर पडले १७ टाके!

“टिकटॉक भारतात परतलं?”

कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफी

पर्यावरणपूरकतेवर भर
या वर्षी आयोजकांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्धार केला आहे. मूर्ती तयार करताना शाडू माती, प्राकृतिक रंग आणि बायोडिग्रेडेबल सजावटीच्या वस्तूंचा वापर करण्यात आला आहे. विसर्जनासाठी घनकचरा व्यवस्थापन आणि जलप्रदूषण टाळण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. गुवाहाटीतील हा गणेशोत्सव केवळ धार्मिक श्रद्धेचं नव्हे, तर एकात्मतेचं आणि सांस्कृतिक समृद्धीचं प्रतीक ठरणार आहे.

 

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
338,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा