29 C
Mumbai
Saturday, January 24, 2026
घरविशेषदेशातील पहिला रेडिओ महोत्सव मुंबईत, मंत्री आशिष शेलार यांची घोषणा

देशातील पहिला रेडिओ महोत्सव मुंबईत, मंत्री आशिष शेलार यांची घोषणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुरस्कार सोहळा

Google News Follow

Related

जागतिक संगीत दिनाच्या औचित्याच्या निमित्ताने २१ जून रोजी सांस्कृतिक कार्य विभागामार्फत यावर्षी देशातील पहिला सृजनशील आणि सांस्कृतिक महाराष्ट्र रेडिओ महोत्सव व महाराष्ट्र आशा रेडिओ गौरव पुरस्कार २०२५ चे आयोजन करण्यात आले असल्याची घोषणा आज सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत केली.

२१ जून रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह येथे ४.३० वाजता सोहळा आयोजित करण्यात आला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत १२ रेडिओ पुरस्काराचे वितरणही करण्यात येणार आहे.

मराठी भाषा आणि कलाकारांसाठी नवे व्यासपीठ

रेडिओ क्षेत्राला गौरव देणारा हा ऐतिहासिक उपक्रम आहे. राज्याची सांस्कृतिक, ऐतिहासिक परंपरा जपण्याचे काम रेडिओ मार्फत झाले आहे. विविध क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मुलाखती आजही रेडिओ मार्फत जतन करण्यात आल्या आहेत. देशाच्या स्वातंत्र्यापासून ते महाराष्ट्राच्या निर्मितीपर्यंत सर्व ऐतिहासिक घटनांचा रेडिओ साक्षीदार आहे. महाराष्ट्रात जशी आकाशवाणीने भूमिका निभावली आहे. तसेच खाजगीकरण आणि पाश्चातीकरणाच्या काळात खाजगी एफएम चॅनेल आणि कम्युनिटी रेडिओनेही भूमिका अधोरेखित केली आहेत.

मराठी संगीत, गाणी, शास्त्रीय संगीत जपणारे, उद्यमशील आणि सृजनशील रेडिओ चॅनलला प्रोत्साहन मिळावे यासाठी हे पुरस्कार प्रदान करण्यात येत आहेत. मराठी निवेदक, मराठी अभिनेते, संगीतकार, गीतकार, लेखक, तंत्रज्ञ, संपादक यांना एक व्यासपीठ मिळावे. त्यांच्या माध्यमातून मराठी कला, साहित्य, संस्कृतीचे जतन करण्यात यावे. तसेच ज्या रेडिओच्या माध्यमातून केवळ मनोरंजन नाही तर प्रबोधन, राजकारण, सामाजिक जाणीव यासाठी भरीव योगदान दिले आहे त्यांना या माध्यमातून योग्य सन्मान देण्यासाठीचा हा प्रयत्न असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

प्रदान करण्यात येणाऱ्या १२ रेडिओ पुरस्कारात आशा रेडिओ गौरव पुरस्कार हा संगीत क्षेत्रातील अग्रगण्य नाव असणाऱ्या “महाराष्ट्र भूषण आशा भोसले” यांच्या नावाने देण्यात येणार आहे. आशा भोसले यांचे संगीत क्षेत्रातील एकूण योगदान लक्षात घेता हे नाव देण्याचे शासनाने निश्चित केल्याचे ॲड आशिष शेलार यांनी सांगितले.

याचबरोबर महाराष्ट्र आशा सर्वोकृष्ट रेडीओ केंद्र, महाराष्ट्र
आशा सर्वोत्कृष्ट कम्युनिटी रेडिओ केंद्र, महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट रेडीओ मनोरंजन कार्यक्रम, महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट रेडीओ सामाजिक कार्यक्रम, महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट रेडीओ पुरुष निवेदक, महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट रेडीओ महिला निवेदक, महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट नवोदित रेडीओ निवेदक, महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट रेडीओ मराठी निवेदक, महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट सामाजिक उत्तरदायित्व भान असणारा कार्यक्रम, आशा सर्वोत्कृष्ट सामाजिक उत्तरदायित्व भान असणारा मराठी कार्यक्रम आणि आशा सर्वोत्कृष्ट स्टोरी टेलिंग कार्यक्रम असे या पुरस्कारांची नावे असून जीवनगौरव पुरस्कार वगळता इतर पुरस्कार हे नामनिर्देशनाद्वारे घोषित करण्यात येतील. यासाठी संबंधित कलाकार तंत्रज्ञ रेडिओ केंद्र यांनी विहित नमुन्यातील माहिती संचालनालयास सादर करावी लागेल. मानचिन्ह, शाल आणि भेटवस्तू असे या पुरस्काराचे स्वरूप असणार आहे. यासाठी रेडिओ क्षेत्रातील तज्ज्ञ कलाकार तंत्रज्ञ अभ्यासक यांसारख्या शासकीय सदस्यांच्या माध्यमातून पुरस्कार मुर्तींची निवड करण्यात येईल, असे मंत्री ॲड आशिष शेलार यांनी सांगितले.

हे ही वाचा:

भारतातून इराणला होणारी तांदळाची निर्यात थांबली, सुक्या मेव्याचे दरही वाढले!

बेंगळुरू चेंगराचेंगरी : हायकोर्टाने दिले महत्वपूर्ण निर्देश !

 

या पुरस्कार सोहळ्या दरम्यान मुख्यमंत्र्यांशी रेडिओ निवेदकांसोबत संवाद साधणार आहेत तर दुसऱ्या भागामध्ये रेडिओशी संबंधित गाणी, चित्रपटांतील ज्या गाण्याच्या पार्श्वभूमीत रेडिओ दिसला आहे अशी गाणी, गप्पा गोष्टी किस्से यांचे सादरीकरण प्रथितयश कलाकारांच्या माध्यमातून होईल.

सुदेश भोसले, श्रीकांत नारायण, संजीवनी भेलांडे अशा नावाजलेल्या कलाकारांच्या सादरीकरणातून सांगितिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांचे सुत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार अंबरिश मिश्र करणार आहेत. या कार्यक्रमांला प्रवेश विनामुल्य असून सन्मानिका सांस्कृतिक कार्य संचालनालयात १९ जूनपासून उपलब्ध होतील. सर्व रेडिओ प्रेमींनी आणि रसिकांनी कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन मंत्री शेलार यांनी केले आहे.

रेडिओचे योगदान

आकाशवाणी हे एक लोकप्रसारणाचे महत्त्वाचे माध्यम म्हणून गणले गेले आहे. १९२७ सालापासून सुरू झालेल्या आकाशवाणीने भारताच्या आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात खूप मोठी भर घातलेली आहे. जनसंवादाचा आणि जनसंपर्काचा “मास मीडिया” म्हणून ओळखले जाणारे आकाशवाणी हे भारतीय माध्यमांचे एक अविभाज्य अंग आहे. आकाशवाणीमुळे अनेक कलाकार घडले असून, अनेक कला प्रकारांना प्रोत्साहन आणि संरक्षणही मिळाले आहे. नव माध्यमांच्या आक्रमणात व नवमनोरंजनाच्या या काळात आकाशवाणीनेही काल सुसंगत परिवर्तन केले आहे. आजही ग्रामीण भागात आकाशवाणीच्या कार्यक्रमांना मोठी पसंती मिळत असते.

महाराष्ट्रात आज घडीस ऑल इंडिया रेडिओ ची २८ केंद्रे, एफ एम रेडिओची सोळा केंद्रे आणि ५४ कम्युनिटी रेडिओची केंद्रे हे काम करत आहेत. रेडिओ सिटी, रेडिओ वन, मॅजिक एफएम, माय एफ एम, टोमॅटो एफ एम, अशी विविध एफ एम चॅनल्स सध्या महाराष्ट्रात कार्यरत आहेत. त्याचबरोबर विविध संस्थांची विविध कम्युनिटी रेडिओ स्टेशन्स ही सुरू आहेत.

रेडिओ महोत्सवामुळे मराठी भाषेच्या प्रचार व प्रसिद्धीस मोठ्या प्रमाणात चालना मिळू शकेल. मराठीसाठी काही पुरस्कार राखीव असल्यामुळे मराठी कलाकार आणि मराठी भाषा यासाठी हा महोत्सव महत्त्वाचा राहणार आहे. नुकतेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. एफ एम रेडिओ व कम्युनिटी रेडिओ ने मराठी भाषेच्या प्रचाराने प्रसिद्धीसाठी उल्लेखनीय काम केलेले आहे. अनेक मराठी कलाकारांना रेडिओमुळे नाव मिळालेले आहे. या महोत्सव व पुरस्काराद्वारे रेडिओ या सशक्त माध्यमाची दखल घेणे, सांस्कृतिक कार्य विभाग व पर्यायाने राज्य शासनाच्या विविध योजना, उपक्रम यांची प्रचार प्रसिद्धी करण्यासाठी रेडिओ या माध्यमांचा वापर करणे या उद्देशाने या पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे, असेही मंत्री शेलार यांनी सांगितले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा