गंगोत्रीकडे जाणारे हेलिकॉप्टर कोसळून पाच भाविकांचा मृत्यू

अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट

गंगोत्रीकडे जाणारे हेलिकॉप्टर कोसळून पाच भाविकांचा मृत्यू

उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात खाजगी हेलिकॉप्टर कोसळून अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास गंगोत्रीकडे जाणारे खाजगी हेलिकॉप्टर कोसळून ही दुर्घटना घडली. यात पाच जणांचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक रहिवासी आणि पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत.

गुरुवारी उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यातील गंगानानीजवळ हेलिकॉप्टर कोसळून पाच प्रवाशांचा मृत्यू झाला, अशी माहिती गढवाल विभागीय आयुक्त विनय शंकर पांडे यांनी दिली आहे. हेलिकॉप्टरमध्ये पायलटसह सहा जण होते. यात पाच जणांचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले आहेत. विनय शंकर पांडे म्हणाले की, अपघाताची बातमी अधिकाऱ्यांना मिळताच, मदत आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली आहे. बचाव कार्यात मदत करण्यासाठी आणि वैद्यकीय मदत पुरवण्यासाठी तातडीने घटनास्थळी पोहोचले आहेत. अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

गुरुवारी सकाळी, एरोट्रान्स कंपनीचे हेलिकॉप्टर डेहराडूनच्या सहस्त्रधारा हेलिपॅडवरून चारधाम यात्रेकरूंना घेऊन यमुनोत्रीसाठी निघाले. यमुनोत्रीच्या खरसाली हेलिपॅडनंतर, हे हेलिकॉप्टर गंगोत्रीला रवाना झाले, जिथे ते हर्षिल हेलिपॅडवर पोहोचायचे होते. हर्षिलला जात असताना, उत्तरकाशीच्या गंगाणी येथे अचानक ते कोसळले. एसडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचली आणि त्यांना हेलिकॉप्टर सुमारे २०० ते २५० मीटर खोल खड्ड्यात पडले असल्याचे दिसले. घटनास्थळी तळ तयार करून आणि खड्ड्यात उतरून पथकाने बचाव कार्य सुरू केले.

हे ही वाचा : 

ऑपरेशन सिंदूरवर खुश थरूर!

पाकची लाज निघाली; भारताची लढाऊ विमाने पाडल्याचा पुरावा मागताचं दिला सोशल मिडीयाचा हवाला

आता कुठे खेळ सुरू झालाय…

राज ठाकरे काय बोलतात याला काही महत्व नाही!

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले की, राज्य आपत्ती प्रतिसाद दल आणि जिल्हा प्रशासनाचे पथक मदत आणि बचाव कार्यासाठी घटनास्थळी पोहोचले आहेत. “मी प्रशासनाला जखमींना सर्वतोपरी मदत करण्याचे आणि अपघाताची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत,” असे पुष्कर सिंह धामी म्हणाले.

Exit mobile version