28.5 C
Mumbai
Friday, November 6, 2026
घरविशेषइराकमधून सीरियातील अमेरिकी लष्करी तळावर पाच रॉकेट डागले!

इराकमधून सीरियातील अमेरिकी लष्करी तळावर पाच रॉकेट डागले!

इराकच्या सुरक्षा सूत्रांकडून माहिती

Google News Follow

इराकचे पंतप्रधान मोहम्मद शिया अल-सुदानी अमेरिकेतून परतल्यानंतर एक दिवसानंतरच रविवारी इराकच्या झुम्मर येथून ईशान्य सीरियातील अमेरिकन लष्करी तळावर रॉकेट डागण्यात आल्याचे उघड झाले आहे. इराकच्या सुरक्षा सुत्रांनी ही माहिती दिली.इराकमधील इराण-समर्थित गटांनी अमेरिकी सैन्याविरुद्धचे हल्ले थांबवल्यानंतर फेब्रुवारीच्या सुरुवातीस अमेरिकन सैन्यावर झालेला हा पहिला हल्ला आहे.

इराकचे पंतप्रधान मोहम्मद शिया अल-सुदानी अमेरिकेच्या दौऱ्यावरून परतल्यानंतर आणि व्हाइट हाऊसमध्ये राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांची भेट घेतल्यानंतर हा हल्ला झाला आहे.दोन सुरक्षा सूत्रांनी आणि एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने सांगितले की, सीरियाला लागून असलेल्या झुम्मर सीमेवर उभ्या केलेल्या एका लहान ट्रकच्या मागे एक रॉकेट लाँचर ठेवण्यात आले होते. लढाऊ विमान आकाशात असताना प्रक्षेपित न केलेल्या रॉकेटचा स्फोट होऊन ट्रकला आग लागली. ही घटना अतिशय संवेदनशील असल्याने याबाबत अधिकारी अधिक काही सांगण्यास तयार नाहीत. आमचा तपास पूर्ण होण्याआधी अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी बॉम्बफेक केल्याच्या वृत्ताला आम्ही दुजोरा देऊ शकत नाही, असे एका लष्करी अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

हे ही वाचा:

न्यूज २४ चा माधवी लता यांच्याबाबत खोडसाळपणा, पोस्ट हटवली!

सांगलीतून विशाल पाटील लोकसभा अपक्ष लढणार?

न्यूझीलंडने तिसऱ्या टी-२० मध्ये पाकिस्तानचा 7 गडी राखून धुव्वा उडवला

चीनधार्जिणे मोइझ्झू यांच्या पक्षाचा विजय

इराकी सुरक्षा दलांना या भागात तैनात करण्यात आले होते आणि दुसऱ्या वाहनांचा वापर करून या भागातून पळून गेलेल्या गुन्हेगारांचा शोध सुरू करण्यात आला होता, असे झुम्मर शहरात असलेल्या एका सुरक्षा अधिकाऱ्याने सांगितले. पुढील तपासासाठी ट्रक जप्त करण्यात आला असून तो हवाई हल्ल्यात नष्ट झाला अल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले आहे.

शनिवारी पहाटे इराकमधील लष्करी तळावर झालेल्या प्रचंड स्फोटात इराण-समर्थित गटांचा समावेश असलेल्या इराकी सुरक्षा दलाचा एक सदस्य ठार झाल्याच्या एक दिवसानंतर हे हल्ले झाले. हा हल्ला होता, असा दावा कमांडरने केला आहे. तर, त्यावेळी आकाशात कोणतेही लढाऊ विमान नव्हते. त्यामुळे या स्फोटाचा तपास सुरू असल्याचे लष्करातर्फे सांगण्यात आले.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा