28 C
Mumbai
Sunday, August 23, 2026
घरविशेषपुराच्या तडाख्यातून वाचली हत्तीणी ‘जॉयमोती’; उपचारांसाठी वनतारात दाखल

पुराच्या तडाख्यातून वाचली हत्तीणी ‘जॉयमोती’; उपचारांसाठी वनतारात दाखल

नागालँडमधील ५३ वर्षीय हत्तीणीची गंभीर अवस्था

Google News Follow

Related

नागालँडमध्ये आलेल्या विनाशकारी पुराच्या तडाख्यातून थोडक्यात बचावलेली ५३ वर्षीय हत्तीण ‘जॉयमोती’ आता नव्या आयुष्याची लढाई लढत आहे. पुराच्या वेगवान प्रवाहात वाहून गेल्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत तिची सुटका करण्यात आली. मात्र जखमांची गंभीरता आणि तिच्या आधीपासूनच्या आरोग्याच्या समस्यांमुळे तिला अधिक तज्ज्ञ उपचारांची गरज होती. त्यामुळे जॉयमोतीला विशेष उपचारांसाठी गुजरातमधील जामनगर येथील वनतारा येथे विमानाने नेण्यात आले असून, तेथे तिच्यावर तज्ज्ञ पशुवैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले आहेत.

जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात नागालँडमध्ये आलेल्या पुरामुळे जॉयमोती अडचणीत सापडली होती. पुराच्या पाण्याच्या जोरदार प्रवाहात ती वाहून गेल्यानंतर स्थानिक नागरिकांनी सरकारी यंत्रणांच्या मदतीने तिची सुटका केली. या दुर्घटनेत तिच्या शरीरावर अनेक ठिकाणी गंभीर जखमा झाल्या. कपाळ, उजवा कान, शेपटीच्या वरचा भाग, डाव्या मांडीचा आतील भाग आणि पोटावर जखमा आहेत. तिच्या बाह्य जननेंद्रियाच्या आसपासही खोल जखम झाली आहे. या जखमांमुळे संसर्गाचा धोका निर्माण झाला होता.
हे ही वाचा:
हे कसले आंदोलन…राहुल गांधी तर चॉकलेट, गोळ्या फेकत होते!

अपघात झालेल्या कारमध्ये सापडली १० किलो सोन्याची बिस्किटे

अलास्कातील विमान दुर्घटनेत ८ जणांचा मृत्यू

हरित लवादाला आदेश; श्री श्री रविशंकर यांना ५ कोटींचा दंड परत करा!

जॉयमोतीच्या उजव्या डोळ्यालाही मोठी दुखापत झाली असून, त्याची दृष्टी गेली आहे. याशिवाय तिच्या डाव्या मागच्या पायाला आधीपासूनच दुखापत होती. लाकूडतोडीच्या काळात झालेल्या फ्रॅक्चरमुळे या पायात कायमची लंगडण्याची समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे चालणे, अन्न आणि पाण्यापर्यंत पोहोचणे यांसारख्या दैनंदिन हालचालींमध्येही तिला अडचणी येत होत्या. पुरातील जखमांमुळे तिची अवस्था आणखी गंभीर झाली.

सुटकेनंतर जॉयमोतीला तातडीने प्राथमिक उपचार देण्यात आले. जखमांवर मलमपट्टी, वेदनाशामक उपचार, जीवनसत्त्वे आणि खनिजांचे पूरक तसेच आवश्यक सहाय्यक उपचार करण्यात आले. मात्र तिचे वाढते वय, शरीरावरील अनेक गंभीर जखमा, डोळ्याची दुखापत आणि आधीपासून असलेली हालचालींची समस्या लक्षात घेता अत्याधुनिक पशुवैद्यकीय उपचारांची आवश्यकता निर्माण झाली.

जामनगरपर्यंतचा लांबचा रस्ते प्रवास जॉयमोतीसाठी अधिक त्रासदायक ठरू शकला असता. त्यामुळे तिच्यावर शारीरिक ताण कमी व्हावा आणि कमीत कमी वेळेत तिला तज्ज्ञ उपचार मिळावेत, यासाठी तिला विमानाने वंतारा येथे हलवण्यात आले. प्रवासादरम्यान तिच्या आरोग्यावर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले आणि तिची सुरक्षितता लक्षात घेऊन विशेष व्यवस्था करण्यात आली.

आता वंतारा येथे तिची सविस्तर वैद्यकीय तपासणी करून जखमा, डोळ्याची स्थिती आणि जुन्या पायाच्या दुखापतीवर उपचार केले जाणार आहेत. तिच्या प्रकृतीनुसार पोषण आणि आवश्यक सहाय्यक उपचारही दिले जातील. महत्त्वाचे म्हणजे, जॉयमोतीला वंतारा येथे कायमस्वरूपी ठेवण्याचा निर्णय झालेला नाही. उपचार पूर्ण झाल्यानंतर आणि ती नैसर्गिक अधिवासात परतण्यासाठी सक्षम असल्याचे डॉक्टरांनी निश्चित केल्यानंतर तिला पुन्हा तिच्या अधिवासात सोडण्यात येणार आहे.

जॉयमोतीची ही कहाणी नैसर्गिक आपत्तीच्या काळात वन्यजीवांच्या बचावासाठी सक्षम यंत्रणा आणि तज्ज्ञ वैद्यकीय सुविधांचे महत्त्व अधोरेखित करते. पुराच्या तडाख्यातून जीव वाचवलेल्या जॉयमोतीसमोर आता पूर्णपणे बरे होण्याचे आव्हान आहे. मात्र वेळेवर झालेली सुटका आणि तज्ज्ञ उपचारांमुळे तिच्या पुनर्वसनाची आशा निर्माण झाली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
328,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा