31 C
Mumbai
Monday, December 8, 2025
घरविशेष९१ व्या वर्षी त्यांनी बनवले ४५० तिरंगे... वाचा राष्ट्रभक्तीची कथा

९१ व्या वर्षी त्यांनी बनवले ४५० तिरंगे… वाचा राष्ट्रभक्तीची कथा

वय वर्ष विसरून राष्ट्रासाठी सात दिवसात ४५० तिरंगे बनवले.

Google News Follow

Related

बिहारमधील ९१ वर्षीय व्यक्तीच्या देशभक्तीची देशभर चर्चा होत आहे. लालमोहन पासवान नावाच्या वृद्धाने दिवसाचे १२ तास काम करून अवघ्या एका आठवड्यात ४५० तिरंगे बनवले आहेत. लालमोहन नेपाळच्या सीमेला लागून असलेल्या सुपौल जिल्ह्यातील निर्मली या गावात राहतात. ते स्वत:ला गांधीवादी म्हणवतात, जवाहरलाल नेहरू आणि राजेंद्र प्रसाद यांना ते आपले आदर्श मानतात. ग्रासलेल्या जगात शांतता नांदण्यासाठी महात्मा गांधीजींचे अहिंसेचा संदेश हाच एकमेव मार्ग आहे, असे लालमोहन पासवान म्हणतात.

लालमोहन पासवान म्हणाले की, जेव्हा मला एका आठवड्यात ४५० तिरंगा वितरित करण्याची संधी मिळाली, तेव्हा मला माहित होते की हे माझ्यासाठी कठीण काम आहे, विशेषतः माझ्या वयात. पण ते एक पवित्र कर्तव्य होते आणि ते पूर्ण केल्याचा मला अभिमान आहे. लालमोहन म्हणाले की, वंचित आणि निराधार वृद्धांना आधार देणार्‍या ‘हेल्पेज इंडिया’ या ना-नफा संस्थेने ‘आझादी का अमृत महोत्सव’ मोहिमेचा भाग म्हणून ४५० ध्वज मागवले होते. वृद्धांना आधार देऊन उपजीविका कार्यक्रमाद्वारे स्वावलंबी बनवते.

हे ही वाचा: 

आंतरराष्ट्रीय क्रिकेटला झुलन करणार अलविदा

इकबाल कासकरच्या बॉडीगार्डला मारणाऱ्या फरार आरोपीच्या आवळल्या मुसक्या

“उद्धव ठाकरेंनी शिवाजी महाराजांसारखा तह करायला हवा होता”

सिसोदियांसह १३ जणांविरुद्ध लुकआऊट नोटीस जारी

हेल्पेज इंडियाचे जिल्हा कार्यक्रम समन्वयक ज्योतिष झा म्हणाले की, स्थानिक शाळा आणि कार्यालयांना ध्वजांचा पुरवठा केला जाणार होता. मात्र, लालमोहन पासवान दिलेल्या हे वेळेत काम पूर्ण करतील, असे आम्हाला आश्वासन देण्यात आले. आठ वर्षांपासून ते आमच्यासोबत काम करत आहेत. त्यांचा वयाच्या ९१ वर्षीही हा संयम सर्वांनाच प्रेरणादायी ठरला आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा